पिंपरी : चोरी, जबरी चोरी तसेच घरफोडीच्या घटना शहरात घडत आहेत. दुचाकीच्या पेट्रोल टाकीसह ट्रकमधील २०० लिटर डिझेल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी सुमारे पावणे तीन लाखांच्या मुद्देमालावर डल्ला मारला. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये मंगळवारी गुन्हे दाखल करण्यात आले.
एक लाखांचा माल चोरला
ज्ञानदेव दिलीप पाटील (वय ३४, रा. मोशी) यांनी या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीचे आवाज भोसरी एमआयडीसीत श्री इलेक्ट्रिकल्स दुकान आहे. हे दुकान सोमवारी (दि. २५) रात्री नऊ ते मंगळवारी (दि. २६) सकाळी नऊ या कालावधीत बंद होते. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील इनॅमेल्ड कॉपर वाइंडिंग वायरचे १० बंडल, असा एकूण एक लाख ५५ हजार रुपये किमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला.
चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली
पुरू महेश गावडे (वय २३, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी नेत्यांची एक लाख पाच हजार रुपये किमतीची दुचाकी हॅण्डल लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार रविवारी (दि. २४) सायंकाळी पाच ते सोमवारी (दि. २५) सकाळी सात या कालावधीत घडला.
दुचाकीचे पेट्रोल टाकी व सिट झोप चोरले
सुरज प्रकाश चौधरी (वय २८, रा. गणेशनगर, जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीचे गणेशनगर, जाधववाडी येथे ड्रायव्हिंग स्कूल आहे. फिर्यादी यांच्या मित्राच्या नावे असलेली दुचाकी ड्रायव्हिंग स्कूलच्या समोर सार्वजनिक रस्त्यावर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकीची पाच हजार रुपये किमतीची पेट्रोल टाकी व सिट झोप येते चोरून नेले. हा प्रकार शनिवारी (दि. २३) सायंकाळी सहा ते रविवारी (दि. २४) सकाळी सात या कालावधीत घडला.
वीस हजारांचे अंदाजे दोनशे लिटर डिझेल चोरले
राकेश विजयसिंग (वय ३२, रा. उत्तर प्रदेश) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीच्या ताब्यातील ट्रक बावधन येथे सेवा रस्त्यावर लॉक करून पार्क केला होता. अज्ञात चोरट्यांनी ट्रकच्या डिझेल टॅंकचे लॉक खोलून त्यातील २० हजार रुपये किमतीचे अंदाजे दोनशे लिटर डिझेल चोरून नेले. हा प्रकार सोमवारी पहाटे चार ते सकाळी साडेनऊच्या दरम्यान घडला.
दुकानात चोरीचा प्रयत्न करणाऱ्यांना पकडले
नरेश जसाराम चौधरी (वय ३१, रा. बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अनिल उर्फ गणी उर्फ मोहींदर लक्ष्मण कडावत (वय २२), धवन किशोर चौधरी, रोहित किशोर चौधरी (सर्व रा. स्वारगेट, पुणे) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच आरोपी नरेश चौधरी याला अटक केली. फिर्यादी यांचे वडील हे त्यांच्या बावधन येथील पवन कलेक्शन नावाच्या दुकानात एकटे होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. तसेच त्यांची नजर चुकवून दुकानाच्या गल्ल्यातून रोख रक्कम चोरली. त्यानंतर इतर माल चोरण्याचा प्रयत्न करून पळून जाण्याच्या प्रयत्न करत असताना आरोपींना फिर्यादी व लोकांच्या मदतीने पकडले.