पिंपरी : पुण्यातील महिला सुरक्षित राहाव्यात, त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी पुणे महानगर परिवहन मंडळाला (पीएमपी) बसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची सूचना करुन त्यासाठी १० लाख रुपयांचा आमदार निधी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोºहे यांनी दिला. तसेच सीसीटीव्ही ज्या मार्गावर महिला उशिरापर्यंत प्रवास करतात अशा मार्गांवर लावण्याच्या सूचना दिल्या.पीएमपीमध्ये काम करणाऱ्या महिला सुरक्षित राहाव्यात, सक्षम व्हाव्यात यासाठी मंगळवारी पीएमपीने सुसंंवाद दिनाचे आयोजन केले होते त्या वेळी त्यांनी ही घोषणा केली. या वेळी बोलताना गोºहे म्हणाल्या, काळानुरूप महिलांमध्ये धाडस आणि समज वाढत चालली आहे, महिला अधिकाºयांची संख्या वाढत असल्यामुळे महिलांचे अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. महिलांच्या मदतीसाठी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे ते स्वागतार्ह असल्याचे सांगून या समितीमधील कामाची व्यवस्था कशी चालते हे सर्वसामान्यांनाही माहीत व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. महिलांच्या सुरक्षेसाठी काम करणाºया पीएमपीमधील महिलांना व पुरुषानांही पुरस्कार द्यावेत, २०० अल्पवयीन मुली स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या, आतापर्यंत ५ हजार कुटुंबांना स्त्री आधार केंद्राने आधार दिला.या वेळी कार्यक्रमाला महापौर मुक्ता टिळक, पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे उपस्थित होत्या.
सीसीटीव्हीसाठी पीएमपीला १० लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 2:58 AM