खिचडीतून अनाथाश्रमातील 30 मुलींना विषबाधा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 12:21 PM2018-09-04T12:21:03+5:302018-09-04T12:23:00+5:30
तळेगाव दाभाडे येथील प्रेरणा रेनबाे अनाथाश्रमातील मुलींना खिचडीतून विषबाधा झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात अाले. त्यांच्या प्रकृतीत अाता सुधारणा हाेत अाहे.
तळेगाव दाभाडे : प्रेरणा रेनबाे अनाथाश्रमातील मुलींना रात्रीच्या जेवनातील खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना समाेर अाली अाहे. रात्री जेवणात खिचडी खाल्यानंतर अाश्रमातील 30 मुलींना उलटी, मळमळ तसेच चक्कर येऊ लागली. त्यांना तातडीने तळेगांव येथील जनरल हाॅस्टिपटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात अाले अाहे.
हाॅस्टिपटलमध्ये दाखल करण्यात अालेल्या 30 मुलींपैकी 20 मुलींच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी साेडण्यात अाले अाहे. तर इतर 10 मुलींवर सध्या उपचार सुरु अाहेत. डाॅ. भवरी यांनी दिलेल्या माहितीनुसार विषबाधा झालेल्या सर्व मुलींची प्रकृती बरी असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा हाेत अाहे. सध्या उपचार घेत असलेल्या मुलींनाही लवकरच साेडण्यात येणार अाहे. विषबाधा झाल्याचे समजताच मुलींना तातडीने हाॅस्पिटलमध्ये दाखल केल्यानेे त्यांना वेळेवर उपचार मिळू शकले. तसेच त्यांची प्रकृतीत सुधारणा हाेत अाहे. डाॅ. अरुण जव्हेरी, डाॅ. विवेक निर्माले, डाॅ. प्रफुल्ल काशीद यांच्या टीमने या मुलींवर तातडीने उपचार केले.