शहरं
Join us  
Trending Stories
1
काही लोकांनी धोकेबाजी करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
2
“जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
3
महाराष्ट्रातील मुस्लिमांनी पुन्हा तोडले ओवेसींचे स्वप्न; MIM ला 1 टक्काही मते मिळाली नाही
4
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
5
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
6
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
7
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
9
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
10
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नाना पटोलेंचा अखेर विजय; २०८ मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव
12
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
15
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
16
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
17
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
19
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
20
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...

पिंपरी-चिंचवड परिसरात थर्टी फर्स्टच्या रात्री ११९ मद्यपींवर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2019 1:05 PM

थर्टी फर्स्टच्या पार्ट्या करून कोणीही मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवू नये. स्वत: व इतरांच्या जीवाला धोका निर्माण करू नये. असे आवाहन आगोदरच पोलिसांनी केले होते.

ठळक मुद्देपुणे शहरातून पिंपरी चिंचवडमध्ये प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदीपुणे शहरातून पिंपरी चिंचवडमध्ये प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी

पिंपरी : गतवर्षाला निरोप आणि नवनवर्षाचे स्वागत या निमित्ताने थर्टी फर्स्टच्या ओल्या पार्ट्या करून परतणाऱ्या ११९ मद्यपी वाहनचालकांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. निगडी, चिंचवड, चाकण, भोसरी, पिंपरी, हिंजवडी, देहुरोड,तळवडे अशा विविध ठिकाणी ब्रिथ अनालायरच्या साह्याने वाहनचालकांची तपासणी केली असता, त्यात मद्य प्राशन करून वाहन चालविणारे आढळुन आले, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. अशी माहिती वाहतुक पोलिसांनी दिली. थर्टी फर्स्टच्या पार्ट्या करून कोणीही मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवू नये. स्वत:च्या व इतरांच्या जिवाला धोका निर्माण करू नये. असे आवाहन आगोदरच पोलिसांनी केले होते. थर्टी फर्स्टच्या निमित्ताने हॉटेलांमध्ये मोठ मोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जाते. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिक आनंद साजरा करतात. मात्र या आनंदाला, उत्साहाला गालबोट लागू नये. याची दक्षता घेण्याच्या सुचनाही पोलिसांनी दिल्या होत्या. थर्टी फर्स्टच्या रात्री प्रमुख वर्दळीच्या रस्त्यावर, चौकात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पुणे शहरातून पिंपरी चिंचवडमध्ये प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली होती. पोलिसांना वाहनचालकांची तपासणी करण्यासाठी ब्रिथ अनालायझर उपकरण देण्यात आली होती. त्या उपकरणाच्या माध्यमातून पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांंची तपासणी केली. निगडीत ६, चिंचवडमध्ये १०, चाकण ३, भोसरी १९, पिंपरी १६, हिंजवडी ५३, देहुरोड ९, तळवडे ३ अशा मिळुन एकुण ११९ जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत पोलिसांनी कारवाई केली. रविवारी पोलिसांनी १२७ मद्यपी वाहनचालनकांवर कारवाई केली होती

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसliquor banदारूबंदी