पिंपरी : सोशल मीडियाचा वापर करीत ग्राहक हेरून विविध राज्यांतील सात मुलींकडून वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या पाच आरोपींना सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. तसेच व्यवसायासाठी आणलेल्या मुलींची तेथून सुटका केली. ही कारवाई मंगळवारी रात्री हिंजवडीत करण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार बलबहादूर प्रधान (वय ४७), रणजित बलबहादूर प्रधान (वय २५, दोघे रा. मुकाईनगर, हिंजवडी), श्यामसुंदर गंगाबहादूर नेवार (वय २३), बळीराम भक्ती शर्मा (वय २२) आणि बळीराम फोनी गौर (वय २२, सर्व रा. आसाम) या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर त्यांचा सनी नावाचा एक साथीदार फरार झाला आहे. हिंजवडी परिसरात सोशल मीडियाचा वापर करून वेश्या व्यवसाय सुरूअसल्याची माहिती खबºयामार्फत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाली. मंगळवारी रात्री सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून हिंजवडीतील इमारतीत पाहणी केली.लक्ष्मी-नरसिंह या इमारतीच्या सदनिकेत दिल्ली, बंगाल, पंजाब, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यांसह नेपाळमधील अशा सात मुली आढळून आल्या. पोलिसांनी त्या सर्वांची सुटका केली. तसेच मुलींकडून वेश्या व्यवसाय करवून घेणाºया पाच आरोपींना अटक केली. आरोपींची कसून चौकशी केली असता, हे आरोपी सोशल मीडियाचा वापर करून ग्राहकांशी संपर्क साधायचे, तसेच त्यांना मुलींची छायाचित्रे पाठवून आर्थिक व्यवहार करायचे. ठरलेल्या ठिकाणी मुलींना पाठवायचे. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून या भागात सुरू आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस अधिक तपास करीत आहेत. अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त पंकज डहाणे व सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.