पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील ४० जणांचे घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एनआयव्ही मध्ये तपासणीसाठी पाठीवण्यात आले होते त्यापैकी ४० जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकाही पॉझिटिव्ह रुग्णात वाढ झालेली नाही. आज नवीन ५० जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठवले आहेत. तर दाखल रुग्णापैकी एकाची तब्येत गंभीर आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा घट्ट होत असून शुक्रवारी तीन रूग्ण आढळून आले आहेत. ४८ तासात शहरात पाच रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकुण रूग्णांची संख्या २७ वर गेली आहे. मरकज येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती असून त्यात एक महिला, पुरूष आणि त्यांची छोटी मुलगीचा समावेश होता.
पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहेशुक्रवारी ५३ जणांचे घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल शनिवारी सकाळी मिळाले आहेत. त्यात ४० जण निगेटिव्ह आले आहेत. ........४२ अहवाल प्रतीक्षेतशनिवारी शहरातील रुग्णालयात ४२ जणांना दाखल केले असून त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीला पाठविले आहेत. त्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत............संशयितांची संख्या वाढतेय शहरातील एकुण रूग्णांची संख्या २७ झाली आहे. तर एकुण दाखल रूग्णांपैकी १२ रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तसेच आज ४० जणांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुळे एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. मात्र संशयितांची संख्या वाढत आहे......................................एक जण गंभीरपिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटिव्हचा आकडा वाढण्यास दिल्लीतील निजामुद्दीन येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिक जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर या नागरिकांच्या सहवासात आलेल्यांचाही महापालिका प्रशासन शोध घेत आहे. गेल्या आठवडा भरात दाखल झालेल्या एकुण पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये मरकज कार्यक्रमातील सहभागी झालेल्या नागरिकांचा समावेश आहे. गेल्या तीन दिवसांपासून मरकज कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांच्या सहवासात आलेल्या नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. महापालिका रुग्णालयात 14 जण उपचार घेत आणि एक जण पुण्यातील रुग्णालयात उपचार घेत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये अजून एकही कोरोनाने मृत्यू झाला नाही ही दिलासादायक बातमी असली तरी १४ पैकी एक जणाची तब्येत गंभीर आहे. तर १३ जणांची तब्येत स्थिर आहे.