पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी ईव्हीएम, व्हीव्हीपीएट मशिनचा वापर केला जाणार आहे. व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएट)मशीनद्वारे प्रत्येक मतदाराने कोणाला मत दिले, याची माहिती मिळणार आहे. व्हीव्हीपीएट मशिनचे प्रात्यक्षिक विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधींना शुक्रवारी (दि.४ जाने.)देण्यात आले.महापालिकेतील तिसऱ्या मजल्यावरील स्थायी समिती दालनात राजकीय पक्षांचे प्रतिनिधींना प्रात्यक्षिक देण्यात आले. यावेळी महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, चिंचवड विधानसभा मतदार संघाचे निवडणूक अधिकारी दिलीप गावडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक श्याम लांडे, तुषार कामठे, काँग्रेसचे मयुर जयस्वाल, शेकापचे भालचंद्र फुगे, रामदास मोरे आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राजकीय पक्षांसोबतच निवडणूक आयोगाने देखील तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएट)मशीन वापरली जाणार आहे. या नव्या ईव्हीएममुळे मतदारांना मतदान केल्यानंतर पावती मिळणार आहे. सात सेकंद ती पावती मतदाराला पाहता येणार आहे. शहरात मोबाईल व्हॅनद्वारे मशिनची जनजागृती केली जाणार आहे. महापौर राहुल जाधव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते ईव्हीएम, व्हीव्हीपीएट मशिन आणि मोबाईल व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला. चिंचवड विधानसभा मतदार संघात उद्यापासून नागरिकांनी मशिनचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे, असे दिलीप गावडे यांनी सांगितले.
आगामी निवडणुकीत मतदान केल्याची मिळणार पावती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 12:24 PM
आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी ईव्हीएम, व्हीव्हीपीएट मशिनचा वापर केला जाणार आहे.
ठळक मुद्दे नव्या ईव्हीएममुळे मतदारांना मतदान केल्यानंतर पावती मिळणार चिंचवड विधानसभा मतदार संघात उद्यापासून नागरिकांनी मशिनचे प्रात्यक्षिक दाखविले जाणारशहरात मोबाईल व्हॅनद्वारे मशिनची जनजागृती केली जाणार