तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा गुरूवारी (दि. २४ मे) दिला. राजीनामा देण्याचे कोणतेही कारण त्यांनी स्पष्ट केले नसले तरी भारतीय जनता पक्षाच्या आदेशानुसार आपण या पदाचा राजीनामा देत आहोत असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. सदर राजीनामा राजीनामा नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी स्वीकारला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर परिषदेच्या डिसेंबर २०१६मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा, जनसेवा विकास समिती आणि आरपीआय आठवले गट यांना बहुमत प्राप्त होत सत्ता परिवर्तन झाले होते. त्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये सुनील शेळके यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. शेळके यांनी १५ महिने उपनगराध्यक्ष आणि पाणी पुरवठा समितीचे पदसिध्द सभापती म्हणून प्रभावीपणे काम केले. स्टेशन आणि गाव भागातील पाण्याचा गंभीर प्रश्न त्यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला. पाणी प्रकल्पांच्या विविध कामातील निविदेतील प्रस्तावित रकमेत कोट्यावधी रूपयांची बचत करून सुमारे १८ टक्के कमी दराने ही कामे त्यांनी केली. सुमारे सव्वा कोटी रूपयांची एक्स्प्रेस फीडर योजनेमुळे अखंड विद्युत पुरवठा प्राप्त झाल्याने २४ तास पाणी उपसा शक्य झाला. त्यामुळे गेले वर्षभर तळेगावकरांना नियमित व पुरेसा पाणी पुरवठा होत आहे. येत्या १५ दिवसात नव्या उपनगराध्याक्षाची निवडीची घोषणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाकडून नवीन उपनगराध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेची घोषणा आगामी १५ दिवसात होण्याची शक्यता आहे. सुनील शेळके सलग दुस-यांदा नगरसेवक म्हणून नगर परिषदेत कार्यरत आहेत. स्थायी समितीसह इतर कोणत्याही समितीवर शेळके सदस्य नसल्याने आता त्यांच्यावर पक्षातर्फे कोणती जबाबदारी सोपवण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
तळेगाव दाभाडेच्या उपनगराध्यक्षाचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 6:54 PM
नगर परिषदेच्या डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर जानेवारी २०१७ मध्ये सुनील शेळके यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
ठळक मुद्देयेत्या १५ दिवसात नव्या उपनगराध्याक्षाची निवडीची घोषणा