पोलीस भरती परीक्षेचा निकाल जाहीर; खुल्या गटासाठी ८५ गुणांचा ‘कट ऑफ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 08:08 PM2021-12-06T20:08:56+5:302021-12-06T20:11:57+5:30
पोलीस भरती निवड समितीने उमेदवारांनी आवेदन अर्जात भरलेल्या माहितीनुसार सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षणानुसार ‘कट ऑफ’ यादी जाहीर केली...
पिंपरी : भावी पोलिसांना प्रतीक्षा असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत ७२० शिपाई पदांच्या भरतीच्या लेखी परीक्षेचा सामाजिक व समांतर आरक्षण निहाय निकाल जाहीर झाला. खुल्या गटाची सर्वसाधारण वर्गासाठी ८५ गुणांची ‘कट ऑफ’ लागली आहे. लेखी परीक्षेला राज्यभरातून तब्बल एक लाख ८९ हजार ७३२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील ८२ हजार ६०८ उमेदवारांनी परीक्षा दिली.
पोलीस भरती निवड समितीने उमेदवारांनी आवेदन अर्जात भरलेल्या माहितीनुसार सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षणानुसार ‘कट ऑफ’ यादी जाहीर केली. एका पदासाठी दहा उमेदवार या प्रमाणानुसार ही ‘कट ऑफ’ यादी असून ११ हजार ५३४ उमेदवारांची यामध्ये निवड झाली आहे. हे उमेदवार कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी करिता पात्र ठरले आहेत.
सामाजिक व समांतर आरक्षण निहाय निकाल -
खुला गट :
सर्वसाधारण (८५), महिला (७९), खेळाडू (८२), प्रकल्पग्रस्त (८५), भूकंपग्रस्त (८१), माजी सैनिक (६९), अंशकालीन पदवीधर (३५), पोलीस पाल्य (७८), गृहरक्षक दल (७८)
ईडब्ल्यूएस (आर्थिकदृट्या मागास) :
सर्वसाधारण (८१), महिला (६३), खेळाडू (७४), प्रकल्पग्रस्त (८१), भूकंपग्रस्त (७८), माजी सैनिक (३६), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (६३), गृहरक्षक दल (६२)
इतर मागास प्रवर्ग :
सर्वसाधारण (७९), महिला (६७), खेळाडू (७०), प्रकल्पग्रस्त (७७), भूकंपग्रस्त (६२), माजी सैनिक (४२), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (६५), गृहरक्षक दल (५९)
विशेष मागास प्रवर्ग :
सर्वसाधारण (७७), महिला (६४), खेळाडू (४६), प्रकल्पग्रस्त (६५), भूकंपग्रस्त (-), माजी सैनिक (३८), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (-), गृहरक्षक दल (४१)
भटक्या जमाती - ड :
सर्वसाधारण (८१), महिला (६७), खेळाडू (६४), प्रकल्पग्रस्त (८२), भूकंपग्रस्त (-), माजी सैनिक (५३), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (-), गृहरक्षक दल (६०)
भटक्या जमाती - क :
सर्वसाधारण (८१), महिला (६९), खेळाडू (६१), प्रकल्पग्रस्त (८१), भूकंपग्रस्त (६५), माजी सैनिक (५१), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (६२), गृहरक्षक दल (६४)
भटक्या जमाती - ब :
सर्वसाधारण (८१), महिला (७२), खेळाडू (६९), प्रकल्पग्रस्त (७४), भूकंपग्रस्त (-), माजी सैनिक (३३), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (६९), गृहरक्षक दल (६९)
विमुक्त जाती - अ :
सर्वसाधारण (८१), महिला (६९), खेळाडू (६८), प्रकल्पग्रस्त (७९), भूकंपग्रस्त (-), माजी सैनिक (३७), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (६७), गृहरक्षक दल (६७)
अनुसूचित जमाती :
सर्वसाधारण (७१), महिला (५५), खेळाडू (४१), प्रकल्पग्रस्त (६२), भूकंपग्रस्त (४२), माजी सैनिक (४८), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (४२), गृहरक्षक दल (४१)
अनुसूचित जाती :
सर्वसाधारण (७७), महिला (६७), खेळाडू (६०), प्रकल्पग्रस्त (७३), भूकंपग्रस्त (६८), माजी सैनिक (३३), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (६६), गृहरक्षक दल (५९)
‘कट ऑफ’नुसार यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार पदभरतीसाठी पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणी होणार आहे. त्याबाबत लवकरच सूचना देण्यात येणार आहे.
- डाॅ. काकासाहेब डोळे, पोलीस उपायुक्त (प्रशासन), पिंपरी-चिंचवड