मावळ तालुक्यात " सरकारी अधिकारी " कार्यालयात दाखवा आणि बक्षीस मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 12:53 PM2019-05-08T12:53:34+5:302019-05-08T12:58:17+5:30

काही खात्यातील अधिकारी व कर्मचारी सकाळी मस्टरवर सही करून निघून जातात, तर कधी दांडी मारतात; तर काहीजण फिरतीच्या नावाखाली फिरून घर गाठतात. 

Show the "government officers in office at Mawal taluka and get award | मावळ तालुक्यात " सरकारी अधिकारी " कार्यालयात दाखवा आणि बक्षीस मिळवा

मावळ तालुक्यात " सरकारी अधिकारी " कार्यालयात दाखवा आणि बक्षीस मिळवा

googlenewsNext
ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीनंतरही कार्यालये ओसमुख्यालयाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक असताना अधिकारी गैैरहजरनिवडणूक संपली असल्याने विविध कामांसाठी नागरिकांची शासकीय कार्यालयातील गर्दीत वाढ 

वडगाव मावळ : मावळ येथील विविध शासकीय कार्यालयांत मंगळवारी भेट देऊन पाहणी केली असता ३० ते ३५ अधिकारी कार्यालयात नव्हते. तर सार्वजनिक बांधकाम खात्यातर तर शुकशुकाट होता. अधिकारी कार्यालयात दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी म्हणायची वेळ नागरिकांवर आली आहे. वडगाव हे तालुक्याचे केंद्र आहे. या ठिकाणी तहसीलदार कार्यालय, मावळ पंचायत समिती, भूमी अभिलेख, वन, आरोग्य खाते, सहायक निबंधक, कृषी यासह अन्य शासकीय कार्यालये आहेत. विविध कामांसाठी शहरासह खेड्यापाड्यातील नागरिक या ठिकाणी येतात. परंतु काही खात्यातील अधिकारी व कर्मचारी सकाळी मस्टरवर सही करून निघून जातात, तर कधी दांडी मारतात; तर काहीजण फिरतीच्या नावाखाली फिरून घर गाठतात. 
लोकसभा निवडणुकीची गेले महिनाभर आचारसंहिता होती. त्यामुळे विविध कामांसाठी नागरिकांनी फोन केले की साहेब म्हणायचे, आचारसंहितेत आहे. त्यामुळे निवडणूक होईपर्यंत काहीच काम होणार नाही. आचारसंहितेच्या नावाखाली महिनाभर नागरिकांची कामे रखडली होती. आता निवडणूक संपली असल्याने विविध कामांसाठी नागरिकांची शासकीय कार्यालयात गर्दी वाढू लागली आहे. परंतु अनेक ठिकाणी अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  मावळ तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये दळणवळणाची सुविधा नाही. तरीही नागरिक तालुक्याची ठिकाणी कामे करण्यासाठी येतात. परंतु सरकारी कार्यालयामध्ये त्यांना अधिकारी भेटत नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पदाधिकाऱ्यांनी तालुक्यात गैैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव करावा. तसेच मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक असताना अनेक अधिकारी मुख्यालयाच्या ठिकाणी हजर नसतात. सुट्ट्या आल्या की विनापरवाना तालुक्याच्या बाहेर जातात.
............

मंगळवारी वडगाव येथील सार्वजनिक बांधकाम खात्यात भेट दिली असता त्या ठिकाणी एकूण १४ अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक मस्टरवर दिसत आहे. पैकी तीन जण हजर होते. कार्यालयात शुकशुकाट दिसत होता. मावळ पंचायत समितीमध्ये सर्व महत्त्वाची खाती आहेत. त्या ठिकाणी एकूण ४२ अधिकारी व कर्मचारी आहेत. पैकी १३ जण गैरहजर होते. महसूल खात्यातही काही जण गैरहजर होते. शेतकऱ्यांच्या विविध जमिनीसंदर्भातील तारखा या ठिकाणी असतात. तालुक्यातील २१ महसुली सजातील गावांना तलाठ्यांना बसायला कार्यालय नाही. त्यामुळे नोंदी व विविध कामांसाठी तलाठी व मंडलाधिकारी भेटत नाहीत. यासह अन्य शासकीय खात्यांतही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे विविध कामांसाठी 

Web Title: Show the "government officers in office at Mawal taluka and get award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.