रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 01:11 AM2018-11-11T01:11:41+5:302018-11-11T01:11:44+5:30

महापालिकेकडून १६० जणांवर कारवाई : सर्व प्रमुख रस्त्यांवर कारवाई तीव्र करणार

The spies on the street recovering from the penalty | रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून दंड वसूल

रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून दंड वसूल

Next

पुणे : शहरात प्रवास करताना दुचाकी, चारचाकी, बस अथवा पायी चालताना रस्त्यांवर थुंकणे आता तल्लफबाजांना चांगलेच महागात पडणार आहे. महापालिकेच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणांतर्गत आत ही मोहीम हाती घेण्यात आली असून, गेल्या आठ दिवसांत अशा प्रकारे रस्त्यांवर थुंकणाऱ्या १६० लोकांकडून प्रत्येकी १५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढे शहरातील सर्व रस्ते, चौकांमध्ये ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.

केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानातंर्गत सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, कचरा टाकणे, थुंकणे, उघड्यावर लघवी करणे, तसेच शौच करणे कायद्याने गुन्हा आहे. यासाठी शासनाने प्रत्येक महापालिकेला आपल्या कार्यक्षेत्रात अशा प्रकारे थुंकणे, घाण, कचरा टाकणे, उघड्यावर लघवी करणे, शौचास जाणाऱ्यांना दंड करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या वतीने नुकतेच याबाबत करण्यात येणाºया दंडाचे निवेदन जाहीर केले आहे. यापुढील ही कारवाई नियमितपणे व सातत्याने करण्यात येणार आहे. सुरुवातील रस्त्यांवर थुंकणाºयांवर कारवाई करण्यात येत असून, पुढील काळात सार्वजनिक इमारतींमध्ये घाण करणाºयांवरदेखील कारवाई करण्यात येणार असल्योच मोळक यांनी स्पष्ट केले.

शहरातील तल्लफ बहाद्दरांवर गेल्या आठ दिवसांपासून कारवाई सुरु करण्यात आली आहे. यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पोलीस प्रशासनाची देखील मदत घेतली जात आहे. गेल्या आठ दिवसांत शहरातील रस्त्यांवर थुंकणाºया १६० लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये केवळ
दंड न करता थुंकलेली जागा संबंधित व्यक्तींकडून साफदेखील करून घेण्यात येत आहे.
- ज्ञानेश्वर मोळक, महापालिका घनकचरा विभाग प्रमुख
 

Web Title: The spies on the street recovering from the penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.