पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून दीड लाखांची रोकड पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 08:33 PM2018-05-17T20:33:57+5:302018-05-17T20:33:57+5:30
दोरीच्या साहाय्याने एकाला बांधून ठेवत तसेच शस्राचा धाक दाखवून त्याच्याकडील दीड लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे.
कामशेत : कामशेत जवळील वाडीवळे गावच्या हद्दीत एका बँकेच्या एजंटला पाळत ठेऊन दुचाकी रस्त्यात आडव्या लावून चार अज्ञातांनी लुटले. मारहाण केल्याने त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी ( दि. १७ ) रोजी दुपारी जना फायनान्स बँक चे कर्मचारी अतुल रमेश चौधरी ( वय २४ रा. तळेगाव दाभाडे) हे वाडीवळे गावात बचत गटाचे दरमहा ठरलेले हप्ते गोळा करण्यासाठी वाडीवळे गावात आला होता. गावातून हप्ते घेऊन तो जात असताना त्यास वाडीवळे फाट्यावर चार अज्ञातांनी दोन दुचाकी रस्त्यावर लावून अडविले व पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून दोरीच्या सहाय्याने बांधून मारहाण केली, आणि त्याच्या जवळील दीड लाख रुपयांची रोख रक्कम , मोबाईल , बॅगेतील टॅब व बॅग काढून घेण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी कामशेत पोलीस तपास करीत आहेत.