टेंपो विहिरीत उलटला ; वाकड मधील विनोदे नगर येथील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 11:02 AM2018-06-03T11:02:15+5:302018-06-03T11:02:15+5:30

वाकड येथील अर्धवट काम झालेल्या डीपी रस्त्याच्या मध्ये एक विहीर अाहे. या विहीरीत शनिवारी रात्री एक अवजड मालाने टेंपाे पडला. सुदैवाने चालक या अपघातून बचावला.

Tempo fall down into well; An incident at Vinod Nagar in Wakad | टेंपो विहिरीत उलटला ; वाकड मधील विनोदे नगर येथील घटना 

टेंपो विहिरीत उलटला ; वाकड मधील विनोदे नगर येथील घटना 

Next

पिंपरी-चिंचवड (वाकड) : येथील विनोदे नगर ते अक्षरा शाळा या १८ मीटर डीपी रस्त्याचे कासव गतीने सुरु असलेल्या कामाबाबत लोकमतने पाठपुरावा करून वृत्ताद्वारे येथील धोका व गैरसोय निदर्शनास आणून दिली होती तर स्थानिक शेतकऱ्यांनी देखील हे काम त्वरित पूर्ण करावे याबाबत अनेकदा तक्रारी केल्या होत्या असे असूनही महापालिकेला याबाबत गांभीर्य नसल्याचे शनिवारी (दि २) मध्यरात्री बाराच्या सुमारास झालेल्या अपघातावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे महापालिकेला जाग येणार तरी कधी त्यांचा गलथान कारभार वाहनचालकांच्या जीवावर बेत त आहे अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. 


           संत तुकाराम कार्यालय ते ताथवडे शिव या २४ मीटर डीपी रस्त्याचे काम तब्बल तीन वर्षांपासून सुरु आहे या अर्धवट असलेल्या ऐन रस्त्यात २० ते २५ फूट खोलविहिर असून या विहिरीला कुठलेही संरक्षण कठडे अथवा आवरन नाही महापालिका एकतर ही रस्त्यात असलेली विहीर बुजवित नाही किंवा तीला कठडे देखील घालण्यात न आल्याने शनिवारी या विहिरीत अवजड मालाने भरलेला टेंपो गेला, बाळू काळे टेंपो हा चालक नशीब बलवत्तर म्हणूनच तसेच विहिरीत पाणी नसल्याने या अपघातातून सुखरूप बचावला त्याला स्थानिक तरुणांच्या मदतीने वर काढण्यात आले. तर क्रेनच्या सहाय्याने रविवारी सकाळीटेंपो विहिरीतून बाहेर काढण्यात आला यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. 

 

            येथील संत तुकाराम मंगल कार्यालय ते विनोदे नगर (ताथवडे शिव) हा २४ मीटरचा अवघ्या १.३ किमी व सिल्वर स्पून हॉटेल ते अक्षरा स्कुल हा १८ मीटर व आठशे मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे यासाठी बाधित शेतकऱ्यांनी जमिनी हस्तांतरित करून देखील रस्त्याचे काम अद्याप पूर्ण होऊ न शकल्यानेरस्त्यावर वारंवार अपघात होत असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. येत्या चार पाच दिवसांनी येथील शाळा सुरु होणार आहेत या रस्त्याने विद्यार्थ्यांना ने-आन करणारया असंख्य बस या रस्त्यावरून धावतात तर पावसाळा देखील अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना येथील धोकादायक विहीर बुजवून रस्त्याचे काम त्वरित पूर्ण गरजेचे आहे. अन्यथा एखादा मोठा अपघात नाकारता येत नाही. याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. 
 

Web Title: Tempo fall down into well; An incident at Vinod Nagar in Wakad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.