थेरगावात टोळक्याचा राडा; पिस्तूल, कोयते हवेत फिरवून वाहनांची तोडफोड

By नारायण बडगुजर | Published: January 21, 2024 05:01 PM2024-01-21T17:01:48+5:302024-01-21T17:02:13+5:30

आरोपींनी कोयते, लाकडी दांडकी, बियरच्या बाटल्या, घेऊन बेकायदेशीर एकत्र येऊन ते हवेत फिरवून परिसरातील लोकांमध्ये दहशत निर्माण केली

The gang's outcry in Thergaon; Vandalizing vehicles by waving pistols and knives in the air | थेरगावात टोळक्याचा राडा; पिस्तूल, कोयते हवेत फिरवून वाहनांची तोडफोड

थेरगावात टोळक्याचा राडा; पिस्तूल, कोयते हवेत फिरवून वाहनांची तोडफोड

पिंपरी : टोळक्याने पिस्तूल, कोयते हवेत फिरवून दहशत निर्माण केली. त्यानंतर बिअरच्या बाटल्या रस्त्यावर फोडून वाहनांची तोडफोड केली. तसेच तिघांकडील रोकड हिसकावली. याप्रकरणी १२ जणांना अटक केली. थेरगाव येथील स्वराज काॅलनीतील पवारनगर येथे शनिवारी (दि. २०) रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. 

अक्षय विलास केदारी (२८, रा. पवारनगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. कैवल्य दिनेश जाधवर (१९रा. उंद्री, हडपसर), शिवशंकर शामराव जिरगे (२२, रा. दत्तानगर, थेरगाव), सुमित सिद्राम माने (२३, रा. शिवराजनगर, रहाटणी), विराज विजय शिंदे (२०, रा. जनता वसाहत, पर्वती, पुणे), गणेश बबन खारे (२६, रा. दगडू पाटील नगर, थेरगाव), अजय भीम दुधभाते (२२, रा. पडवळनगर, थेरगाव), शुभम चंद्रकांत पांचाळ (२३, रा. काळेवाडी), ऋषिकेश हरी आटोळे (२१, रा. बेलठीकानगर, शिवदर्शन काॅलनी, थेरगाव), रोहित मोहन खताळ (२१, रा. दगडू पाटील नगर, थेरगाव), मुन्ना एकनाथ वैरागर (२१, रा. पवारनगर, थेरगाव), अनिकेत अनिल पवार (२७, रा. पवारनगर, थेरगाव), प्रितम सुनील भोसले (२०, रा. आदर्शनगर, काळेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित हे वाहनांवरून आले. हातामध्ये पिस्तूलसारखे हत्यार, कोयते, लाकडी दांडकी, बियरच्या बाटल्या, घेऊन बेकायदेशीर एकत्र येऊन ते हवेत फिरवून परिसरातील लोकांमध्ये दहशत निर्माण केली. बियरच्या बाटल्या रस्त्यावर फोडल्या. रस्त्याच्या कडेला असलेली रिक्षा व दुचाकी कोयत्याने फोडून नुकसान केले. फिर्यादी अक्षय केदारी यांच्या खिशातील एक हजार ६०० रुपये मित्र यश सपकाळ याच्या खिशातील एक हजार २०० रुपये व मित्र अजय नवले याच्या खिशातील ७०० रुपये, असे एकूण तीन हजार ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेऊन धमकी दिली. तसेच परिसरात दहशत निर्माण केली. सहायक पोलिस निरीक्षक पद्मभूषण गायकवाड तपास करीत आहेत.

Web Title: The gang's outcry in Thergaon; Vandalizing vehicles by waving pistols and knives in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.