पिंपरी : मोरवाडीतील लक्ष्मण रेसिडेन्सी या गृहसंस्थेत रविवारी दुपारी अडिचच्या सुमारास घराचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी अविनाश सावंत यांनी पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण रेसिडेन्सीमधील बी विंग येथील सदनिकेत राहणाऱ्या सावंत यांच्या सदनिकेचे कुलुप तोडून चोरटयांनी कपाटातील ऐवज पळविला. त्यामध्ये ३५ हजार रुपये रोख आणि दोन लाख ८५५ रुपये किंमतीचे दागिने चोरट्यांनी पळविले. मोरवाडीत याच परिसरात राम प्रसाद श्रीराम गुप्ता यांच्या सदनिकेच्या दरवाजाचा कुलुप कोयंडा तोडुन चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला. त्यांनीही याबबत पोलिसांत तक्रार दिली आहे. मोरवाडी येथे जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या खोदाईचे काम सुरू आहे. या परिसरात रस्ते खोदाईच्या कामाच्या यंत्रांचा खडखडाट सुरू आहे, या परिस्थितीत कडी कोयंडा तोडफोडीचा आवाज कोणाला जाणार नाही, चोरट्यांनी फायदा उठविला आहे. भरदिवसा हा चोरीचा प्रकार घडला आहे.
चोरट्यांनी लांबवला तब्बल सव्वा लाखांचा ऐवज; पिंपरीमधील मोरवाडीतील प्रकार, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 2:43 PM
मोरवाडीतील लक्ष्मण रेसिडेन्सी या गृहसंस्थेत रविवारी दुपारी अडिचच्या सुमारास घराचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
ठळक मुद्देअज्ञात चोरट्याविरूद्ध दाखल झाला गुन्हा भरदिवसा घडला चोरीचा प्रकार, अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल