महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे शहरातील अनधिकृत टपऱ्या, हातगाड्यांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 04:13 PM2020-01-03T16:13:01+5:302020-01-03T17:57:12+5:30

देहू - आळंदी रस्त्यावरील आठवडे बाजार

three sheetcards, tempo, handles, stamps seized | महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे शहरातील अनधिकृत टपऱ्या, हातगाड्यांवर कारवाई

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे शहरातील अनधिकृत टपऱ्या, हातगाड्यांवर कारवाई

Next
ठळक मुद्दे महापालिका व पोलिसांच्या पथकाची संयुक्त कारवाई

पिंपरी : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे शहरातील अनधिकृत टपऱ्या, हातगाड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्याअंतर्गत गुरुवारी (दि. २) देहू-आळंदी रस्त्यावर आठवडे बाजारात कारवाई झाली. तीन पत्राशेड हटवून दोन टेम्पो, चार हातगाड्या, तीन टपऱ्या यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले. रस्त्यावरील भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडील भाजीपाला जप्त करण्यात आला. महापालिकेचे कर्मचारी तो भाजीपाला मोशी येथील कचरा डेपोत घेऊन गेले. 
देहू-आळंदी रस्त्यावर डायमंड चौक, मोइ फाटा ते टाळ चौक, पाटील नगर येथे कारवाई झाली. महापालिकेचे प्रभारी प्रशासन अधिकारी सुरेश कोंढरे यांनी याबाबत माहिती दिली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार, कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक नीलिमा जाधव, पोलीस निरीक्षक (नियोजन) प्रसाद गोकुळे, पोलीस निरीक्षक दिलीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई करण्यात आली. 
चार हातगाड्या, तीन लोखंडी टपऱ्या, सहा लोखंडी काऊंटर, आठ लाकडी काऊंटर, २८ प्लॅस्टिक क्रेट, आठ लोखंडी खाटा, दोन टेम्पो, एक लोखंडी कमान, पाच स्टीलचे पाईप, दोन लोखंडी बाके, चार लाकडी स्टँड, दोन लोखंडी बोर्ड, दोन लोखंडी स्टँड, तीन पोते कपडे, दोन पोती बेडशीट, तीन पोते स्वेटर, एक पोते कापडी पिशव्या तसेच एक पोते इतर साहित्य यावेळी जप्त करण्यात आले. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक क्रमांक तीनचे अधिकारी- कर्मचारी, स्थानिक पोलीस यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत टपऱ्या, हातगाड्यांवर महापालिका व पोलिसांकडून संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यांतर्गत गुरुवारी देहू-आळंदी रस्त्यावरील आठवडे बाजारात ही कारवाई झाली. यापुढेही अशी कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी किंवा कोणीही वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
- प्रसाद गोकुळे, पोलीस निरीक्षक (नियोजन), वाहतूक विभाग, पिंपरी-चिंचवड

Web Title: three sheetcards, tempo, handles, stamps seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.