पिंपरी : वंचित बहुजन आघाडीच्या माधवी जोशी यांनी बुधवारी (दि.२४) मावळमधून उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर्जत येथील माधवी जोशी या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होत्या. परंतु, महाविकास आघाडीत मावळची जागा ठाकरे गटाला सुटली. त्यामुळे जोशी यांनी शनिवारी वंचितमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळविली.
महायुतीकडून खासदार श्रीरंग बारणे, महाविकास आघाडीकडून माजी महापौर संजोग वाघेरे आणि वंचितच्या माधवी जोशी यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढत होणार आहे.