महापालिकेत बदल्यांचे वारे, आयुक्तांकडून संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 02:49 AM2018-05-10T02:49:28+5:302018-05-10T02:49:28+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या होणार असल्याचे संकेत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. ‘कर्मचाºयांचे हितसंबंध निर्माण होतात. असे प्रकार घडू नये, याची खबरदारी बदल्या करताना घेण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या होणार असल्याचे संकेत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. ‘कर्मचाºयांचे हितसंबंध निर्माण होतात. असे प्रकार घडू नये, याची खबरदारी बदल्या करताना घेण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
महापालिकेत साडेसात हजार अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून दर वर्षी मे महिन्यात विभागांतर्गत बदल्या केल्या जातात. याकरिता प्रशासनाकडून संबंधित पात्र कर्मचाºयाचा एकूण सेवा कालावधी, विभागात बजावलेली सेवा अशा विविध बाबींचा विचार केला जातो. काही दिवसांसाठी रजेवर जाण्यापूर्वी या सर्व अधिकारी व कर्मचाºयांच्या विभागांतर्गत बदल्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती आयुक्त हर्डीकर यांनी दिली.
आयुक्त हर्डीकर रजेवर जाणार असून त्यापूर्वी महापालिकेतील अनेक विभागातील बदल्यांचे आदेश काढणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. कर्मचाºयांमध्ये बदल्यांबाबत चर्चा सुरू आहे.
दोन दिवसांत होणार बदल्या
बदली करताना कर्मचारी मात्र, वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत असल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आली आहे. त्याबाबत आयुक्त म्हणाले, ‘‘संबंधित कर्मचाºयाची प्रशासनाला असलेली उपयुक्तता, स्थानिक गरज या बाबींचा प्रामुख्याने विचार केला जातो.मात्र, अनेक वर्षे एकाच विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाºयाचे हितसंबंध निर्माण होऊन, तो अधिकारी अथवा कर्मचारी आपल्या पदाचा गैरवापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही, अधिकारी कर्मचाºयांच्या बदल्या करताना ही खबरदारी घेतली जाईल.’’