तुंग किल्ल्यावरुन दरीत पडून ट्रेकर मुलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 10:14 PM2018-07-15T22:14:21+5:302018-07-15T22:14:48+5:30

पवन मावळातील कठिणगड म्हणून ओळखल्या जाणार्‍या तुंग किल्ल्यावरुन आज दुपारच्या सुमारास दरीत पडल्याने एका पंधरा वर्षीय ट्रेकर मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

Trekker dies due to fall from Tung fort | तुंग किल्ल्यावरुन दरीत पडून ट्रेकर मुलीचा मृत्यू

तुंग किल्ल्यावरुन दरीत पडून ट्रेकर मुलीचा मृत्यू

Next

लोणावळा : पवन मावळातील कठिणगड म्हणून ओळखल्या जाणार्‍या तुंग किल्ल्यावरुन आज दुपारच्या सुमारास दरीत पडल्याने एका पंधरा वर्षीय ट्रेकर मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. इशिता मुकुंद माटे (वय 15, रा. अलसफायर बिल्डिंग मगरपट्टासिटी हडपसर, पुणे ) असे, या मयत मुलीचे नाव आहे.
मुंबई येथील पकमार्क इको टूर या कंपनीच्या वतीने ऑनलाईन बुकिंग घेत तुंग किल्ल्यावर एका कॅम्पचे आयोजन केले होते. यामध्ये मुंबई येथील दहा व पुण्यातील पाच जणांनी नोंदणी केली होती. आज सकाळी हे सर्व जण तुंग किल्ल्यावर आल्यानंतर किल्ल्याचा परिसर फिरुन खाली उतरत असताना पाय घसरल्याने इशिता खोल दरीत पडली. 
दरीत पडल्यामुळे तिच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तिचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी लोणावळा ग्रामिणचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राकेश पालांडे तपास करत आहेत.

Web Title: Trekker dies due to fall from Tung fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.