'सत्य परेशान हो सकता है, पराजित नही..': सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 02:03 PM2018-11-15T14:03:17+5:302018-11-15T19:26:45+5:30

अवनी वाघीण नरभक्षक झाली होती. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसारच तिचा एन्काऊंटर करण्यात आला आहे.

'Truth can be disturbing, can not be defeated': Sudhir Mungantiwar | 'सत्य परेशान हो सकता है, पराजित नही..': सुधीर मुनगंटीवार

'सत्य परेशान हो सकता है, पराजित नही..': सुधीर मुनगंटीवार

Next
ठळक मुद्देइतर कोणालाही राजीनामा मागण्याचा अधिकार नाहीसरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक

पिंपरी चिंचवड :- अवनी वाघीण नरभक्षक झाली होती. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसारच तिचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे कोणतेही उल्लंघन झाले नाही. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही हो सकता असे सांगत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांचा राजीनामा मागणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. तसेच माझा राजीनामा मनेका गांधी नव्हे भाजप अध्यक्ष अमित शहा मागू शकतात. इतर कोणालाही राजीनामा मागण्याचा अधिकार नाही, असेही ते म्हणाले. 
पिंपरीतील एच. ए मैदनावर असोसिएशन आॅफ इन्व्हेस्टमेंट होटिकल्चर असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय फुलांच्या प्रदर्शनाचे उद्घाघटन गुरुवारी हस्ते झाले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. 
यावेळी सताष शितोळे, विशाल जोगदड उपस्थित होते.सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे.  मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार सरकार आरक्षण देणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. 

...........................

मनेका गांधींचे कोणतेही पत्र मला मिळालेले नाही. माहिती अधिकाराचा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा वापर करून हवं तर त्या याप्रकरणाची माहिती मागवू शकतात. आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ट्विटर सह सोशल मीडियावर दिले जाऊ शकत नाही. नरभक्षक वाघिणीचे एवढे समर्थन कशासाठी..असा सवाल देखील सुधीर मुनगंटीवार यांनी दुसऱ्या एका कार्यक्रमात केला. 

Web Title: 'Truth can be disturbing, can not be defeated': Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.