महापालिका रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट; तीन महिन्यांसाठी डॉक्टर, परिचारिका कर्मचाऱ्यांवर होणार ११ कोटी खर्च  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 09:28 PM2021-09-08T21:28:48+5:302021-09-08T21:29:24+5:30

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयासह नऊ रूग्णालयांमधील कर्मचाऱ्यांचे आता खासगीकरण होणार आहे.

Try of privatization of Municipal Hospital; 11 crore will be spent on doctors and nurses for three months | महापालिका रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट; तीन महिन्यांसाठी डॉक्टर, परिचारिका कर्मचाऱ्यांवर होणार ११ कोटी खर्च  

महापालिका रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट; तीन महिन्यांसाठी डॉक्टर, परिचारिका कर्मचाऱ्यांवर होणार ११ कोटी खर्च  

Next

पिंपरी : कोरोना कालखंडात महापालिकेच्या वतीने चार रुग्णालये सुरू केली आहेत. मात्र, तेथील नोकरभरती महापालिका अस्थापनावर करण्याऐवजी ठेकेदारीपद्धतीने घेण्याचा घाट प्रशासनाच्या वतीने घातला जात आहे. तीन ठेकेंदारांना शहरातील रुग्णालयांसाठी १०३८ डॉक्टर, पॅरामेडीकल स्टॉफ, कर्मचारी  पुरविण्यासाठी ११ कोटींचा खर्च होणार आहे. दोन वर्षांसाठी या रूग्णालयांमधील १ हजार ३८ कर्मचाऱ्यांवर ९४ कोटीचा खर्च होणार आहे. आयुक्तांनी मांडलेल्या या आयत्या वेळच्या प्रस्तावास स्थायी समिती सभेत मान्यता दिली.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयासह नऊ रूग्णालयांमधील कर्मचाऱ्यांचे आता खासगीकरण होणार आहे. या रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून स्टाफनर्स, पॅरामेडीकल स्टाफसह इतर कर्मचाऱ्यांची ठेकेदारी पद्धतीने नियुक्ती केली जाणार आहे.
......................
खासगीकरणाचा डाव
महापालिकेच्या ७०० खाटांच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयासह यमुनानगर रूग्णालय, थेरगाव, जिजामाता, सांगवी, नवीन भोसरी, जुने भोसरी,  जुने आकुर्डी, तालेरा आणि आकुडीर्तील नवीन रूग्णालय ही नऊ रूग्णालये आहेत. या रूग्णालयांमध्ये महापालिकेचा कायमस्वरूपी अधिकारी, कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. तसेच महापालिकेतर्फेत वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून इतर पॅरामेडीकल स्टाफची सहा महिने कालावधीसाठी मानधनावर नेमणूक केली जाते. मात्र, महापालिकेने आता वायसीएम रूग्णालयासह इतर नऊ रूग्णालयांमधील कर्मचारी भरतीचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
...........................
तीन ठेकेदारांना काम
निविदा प्रक्रीया राबवून बीव्हीजी इंडीया लिमिटेड, श्रीकृपा सव्हीर्सेस प्रायव्हेट लिमिटेड आणि रूबी एल केअर सव्हीर्सेस प्रायव्हेट लिमिटेड या तीन पुरवठाधारकांची दोन वर्षांसाठी नेमणूक करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. ३१ आॅगस्ट रोजी झालेल्या पुरवठाधारकांच्या सभेत लॉटरी पद्धतीने पुरवठाधारकांना रूग्णालयांचे वाटप निश्चित केले. त्यानुसार, बीव्हीजी इंडीया यांना वायसीएम रूग्णालय आणि वायसीएम रूग्णालयातील कुटुंब कल्याण विभागासाठी मनुष्यबळ पुरविण्याचे काम दिले आहे.  श्रीकृपा सव्हीर्सेस यांना यमुनानगर, थेरगाव, जिजामाता आणि सांगवी रूग्णालयात तर, रूबी एलकेअर सव्हीर्सेस यांना नवीन भोसरी, जुने भोसरी,  जुने आकुर्डी, तालेरा आणि आकुर्डीतील कै. प्रभाकर कुटे रूग्णालयात मनुष्यबळ पुरविण्याचे काम दिले आहे.


अशी भरणार पदे
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस), दंतशल्य चिकीत्सक, फार्मासिस्ट, स्टाफनर्स, एएनएम, लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, सीएसएसडी टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, ब्लड बँक टेक्निशियन, ब्लड बँक कौन्सिलर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (मेडीकल सोशल वर्कर, डायलीसीस टेक्निशियन, फिजिओथेरपिस्ट, डाटा एन्ट्री आॅपरेटर, भांडारपाल (स्टोअर किपर), बायोमेडीकल इंजिनिअर, वॉर्डबॉय, वॉर्ड आया आदी मनुष्यबळ आऊटसोर्सिंगद्वारे भरती करण्यात येणार आहे.
 ..........................
१) महापालिकेचे यशवंतराव चव्हाण रुग्णालय-कर्मचारी ३४३, एकूण खर्च-३ कोटी ०० लाख ६० हजार ६५७. सेवा शुल्क-१०,६४,५३२
२) महापालिकेची जुणी रुग्णालये-कर्मचारी एकूण ३३९, एकूण खर्च-कोटी ७ लाख ९४ हजार २३४, सेवा शुल्क-१५,६६,३४२
३) महापालिकेची नवीन रुग्णालये-कर्मचारी एकूण ३५६, एकूण खर्च-४ कोटी २५ लाख २२ हजार २३४. सेवा शुल्क-१५,४५,४८०
...........
१०३८ अधिकारी, कर्मचाºयांची नेमणूक
वायसीएम रूग्णालय आणि वायसीएम रूग्णालयातील कुटुंब कल्याण विभागासाठी एकूण ३४३ अधिकारी, कर्मचाºयांची नेमणूक केली जाणार आहे. त्यांच्या वेतनापोटी एक महिन्याकरिता ९६ लाख ६५ हजार रुपये खर्च होणार आहे. तर, तीन महिने कालावधीसाठी ३ कोटी ६० हजार रुपये खर्च होणार आहे. यमुनानगर, थेरगाव, जिजामाता आणि सांगवी रूग्णालयासाठी एकूण ३५६ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. त्यांच्या वेतनापोटी एक महिन्याकरिता १ कोटी ३६ लाख ५८ हजार रुपये खर्च होणार आहे. तर, तीन महिने कालावधीसाठी ४ कोटी २५ लाख २२ हजार रुपये खर्च होणार आहे. नवीन भोसरी, जुने भोसरी,  जुने आकुर्डी, तालेरा आणि आकुडीर्तील नवीन प्रभाकर कुटे रूग्णालयासाठी एकूण ३३९ अधिकारी, कर्मचाºयांची नेमणूक केली जाणार आहे. त्यांच्या वेतनापोटी एक महिन्याकरिता १ कोटी ३० लाख ७५ हजार रुपये खर्च होणार आहे. तर, तीन महिने कालावधीसाठी ४ कोटी ७ लाख ९४ हजार रुपये खर्च होणार आहे.

Web Title: Try of privatization of Municipal Hospital; 11 crore will be spent on doctors and nurses for three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.