पिंपरी : पिंपळे गुरव येथील सभामंडपाचे काम महापालिकेच्या एका ठेकेदारांच्या आशीर्वादाने उपठेकेदारामार्फत सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या अभियंत्यानी सभामंडळाच्या अनधिकृत बांधकामाला नोटीस देण्याचे सोपस्कर पूर्ण केले. तरी स्थानिक राजकीय नेते, काही नगरसेवक व महापालिका अधिका-यांचे या कामाला पाठबळ असल्याचे दिसून येत आहे.
पिंपळे गुरव येथे नव्याने उभारल्या जाणाºया मंदिराच्या सभामंडपाचा स्लॅब पडून तीनजणांचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत प्रार्थनास्थळांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिंपरी-चिंचवडमहापालिका परिसरात नदीपात्र, उद्याने, क्रीडांगणे, मैदाने, विविध आरक्षणांच्या जागांवर प्रार्थनास्थळे, समाज मंदिरे उभारून जागा हडपण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. महापालिका, प्राधिकरण, म्हाडा अशा विविध कार्यक्षेत्रांत अनधिकृतपणे प्रार्थनास्थळे उभारण्यात आली आहेत. यास राजकीय नेते आणि प्रशासनाचे पाठबळ मिळत आहे. सर्वच भागात सध्या अनधिकृत बांधकामे जोरात सुरू आहेत. मात्र, महापालिका प्रशासन आणि प्राधिकरण, म्हाडा प्रशासन मूग गिळून बसत आहे. कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई होताना दिसत नाही. योग्य वेळी कारवाईकडे दुर्लक्ष सन २०१५ नंतरच्या बांधकामांना अभय देऊ नये, असे धोरण स्वीकारले असताना शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. अनधिकृत प्रार्थनास्थळांच्या विरोधात प्राधिकरणाने कारवाई केली. मात्र, महापालिकेच्या वतीने कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. पिंपळे गुरव येथे स्मशानभूमीशेजारी सुरू असणारे मंदिराचे बांधकाम अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. स्मशानभूमीचे काम करणाराच ठेकेदार असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.गणेश तलाव येथेही विनापरवाना बांधकाम४प्राधिकरणातील गणेश तलाव आवारात एका मंदिराचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम आमदार, खासदारांच्या निधीतून होत आहे. याबाबत सजग नागरिकांनी तक्रार केली आहे. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार आहे. मंदिराविषयी तक्रार करणाºया नागरिकांना संबंधित व्यक्तीने धमकी दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी बुधवारी दुपारी पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांची भेट घेऊन धमकी प्रकरणाची माहिती दिली आहे. गणेश तलाव येथेही विनापरवाना बांधकाम थांबवावे, तसेच अनधिकृत बांधकामप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सजग नागरिकांनी केली आहे.बांधकाम विभागाकडून ठेकेदाराला नोटीस४पिंपळे गुरव येथे झालेल्या मंदिर अपघातप्रकरणी चौकशी करण्याचेनिर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. संबंधित मंदिराच्या कामास१६ नोव्हेंबर २०१८ रोजी महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने नोटीस दिली होती. हे बांधकाम ३५ बाय ३५ चौरस मीटरचे असून, पवना नदीकाठी असणाºया जागेत मंदिर उभारले जात होते. तसेच २४ तासांच्या आत बांधकाम काढून घ्यावे असे सूचित केले होते. त्यानंतरही काम सुरू असल्याने अपघात झाला.मंदिर पडून काही जणांचा मृत्यू झाला, ही घटना दुर्दैवी आहे. पिंपळे गुरव येथे उभारण्यात येणारे मंदिराचे बांधकाम हे विनापरवाना असून, अपघाताची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त केली आहे. अतिरिक्त आयुक्त आणि सहशहर अभियंता यांची समिती चौकशी करणार आहे. दोषी असणाºयांवर फौजदारी दाखल केली जाणार आहे. प्राधिकरण परिसरातील गणेश तलाव येथील बांधकामाविषयी माहिती मिळाल्यानंतर काम थांबविले आहे. - श्रावण हर्डीकर,आयुक्त, महापालिका