अज्ञात वाहन नोंदीचे गौडबंगाल, अपघातग्रस्तांवर होतोय अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 03:25 AM2017-12-13T03:25:05+5:302017-12-13T03:25:52+5:30

शहरात विविध ठिकाणी अपघाताच्या घटना घडतात. अनेकदा अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी या घटना घडतात. अपघातात एखाद्याचा जीव जातो.

Unaware of vehicle log entry, injustice on accidents | अज्ञात वाहन नोंदीचे गौडबंगाल, अपघातग्रस्तांवर होतोय अन्याय

अज्ञात वाहन नोंदीचे गौडबंगाल, अपघातग्रस्तांवर होतोय अन्याय

googlenewsNext

पिंपरी : शहरात विविध ठिकाणी अपघाताच्या घटना घडतात. अनेकदा अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी या घटना घडतात. अपघातात एखाद्याचा जीव जातो. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या अपघाताच्या घटनेचे कोणत्या ना कोणत्या सीसीटीव्ही कॅमे-यात चित्रीकरण झालेले असूनही त्या अज्ञात वाहनांचा पोलिसांकडून तपास होत नाही, याबद्दल नागरिक संताप व्यकत करीत आहेत.
बहुतांश घटनांमध्ये एखाद्याचा मृत्यू होतो, अशा वेळी ठोकर देऊन गेलेले वाहन अज्ञात असल्याची नोंद होत असल्याचे निदर्शनास आले आहे. किरकोळ अपघात घडून येतो, त्यात एखाद-दुसरी व्यक्ती किरकोळ जखमी होते. त्या वेळी अपघातातील वाहनाची, वाहनचालकांची इत्थंभूत माहिती पोलिसांना प्राप्त होते. मात्र अपघातात ज्या वेळी व्यक्ती दगावते, त्या वेळी मात्र अपघातातील वाहन हे अज्ञात असल्याची नोंद होताना दिसून येते. पोलिसांच्या या कार्यपद्धतीबद्दल नागरिक संशय व्यक्त करीत आहेत.
एखादा अपघात अथवा दुर्घटना घडल्यास बघ्यांची गर्दी जमते. अनेक जण अपघात स्थळावरील छायाचित्रे मोबाइलमध्ये कैद करतात. जखमींची रक्तरंजित छायाचित्रे काही वेळातच व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल होतात. अपघातात ठोकर देणारे आणि एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाºया वाहनाचा तपशील मात्र कोणाकडे मिळत नाही. पोलीससुद्धा बहुतांश अपघाताच्या घटनांमध्ये अज्ञात वाहनचालक अशीच नोंद करून गुन्हा दाखल करून मोकळे होतात. अपघातग्रस्त वाहनचालकाला कायदेशीर कारवाईच्या ससेमिºयातून सुटका मिळावी, या उद्देशाने असे प्रकार घडू लागल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

- भूमकर चौक, वाकड येथे गत महिन्यात ९ नोव्हेंबरला गजानन रामचंद्र मुळे या २५ वर्षे वयाच्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. वाकड पोलिसांनी अपघाती मृत्यू अशी नोंद केली. त्याचबरोबर अज्ञात वाहनाची धडक असा त्यात उल्लेख केला. महिनाभराचा कालावधी उलटून गेला, तरी वाकड पोलिसांना अज्ञात वाहनाचा तपास लागलेला नाही. परिसरातील सीसीटीव्हीत अपघात कैद झाला असावा, फुटेज तपासून अज्ञात वाहनाचा, वाहनचालकाचा शोध घ्यावा, अशी मागणी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेले चुलते दिगंबर शंकरराव मुळे यांनी केली आहे. अपघातातील अज्ञात वाहनाचा शोध का लागत नाही असा मुद्दा उपस्थित करणारे निवेदन त्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांना दिले आहे. अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याची तयारी आहे. मात्र पोलिसांकडून योग्य प्रकारे सहकार्य मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Unaware of vehicle log entry, injustice on accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.