पिंपरी : वाहन चालविण्याचा परवाना मागितल्यावरून वाहतूक पोलीस कर्मचाºयांशी हुज्जत घालून एका वाहनचालकाने त्यांना धक्काबुक्की केली. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी मारुती लक्ष्मण दैमगुंड (वय २३) या तरुणाला ताब्यात घेतले आहे. हिंजवडी आणि वाकड परिसरात वाहतूक नियमन करणाºया पोलीस कर्मचाºयांना धक्काबुक्की, मारहाण करण्याच्या घटना यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत.हिंजवडी येथील फेज दोन मधील प्रो-सर्कल परिसरात कर्तव्य बजावत असताना वाहतूक पोलीस कर्मचारी आबासाहेब सावंत यांनी वाहनचालकाला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हटकले. वाहन परवाना आहे का, अशी त्याच्याकडे विचारणा केली. मात्र वाहन परवाना दाखविण्याचे सौजन्य न दाखवता, त्या वाहनचालकाने पोलीस कर्मचाºयाबरोबर हुज्जत घातली. एवढ्यावरच न थांबता त्याने धक्काबुक्कीही केली. याप्रकरणी सावंत यांनी वाहनचालका विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 5:56 AM