वारक-यांची ताडपत्री गुणवत्तापूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 06:05 AM2017-07-28T06:05:44+5:302017-07-28T06:05:44+5:30
आषाढी वारीतील दिंडीप्रमुखांना देण्यात येणारी ताडपत्री गुणवत्ता तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविली असून, त्यांचा अहवाल आला.
पिंपरी : आषाढी वारीतील दिंडीप्रमुखांना देण्यात येणारी ताडपत्री गुणवत्ता तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविली असून, त्यांचा अहवाल आला. दर्जा योग्य आहे, अशी माहिती सहायक आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. गुणवत्ता आणि व्हॅट बिलाबाबत लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने चौकशी केल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, वाढीव दराने खरेदी झाली किंवा नाही, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
दिंडीप्रमुखांना महापालिकेच्या वतीने भेटवस्तू देण्यात येते. राष्टÑवादी काँग्रेसच्या कालखंडात विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीखरेदी गैरव्यवहार प्रकरण गाजल्यानंतर चौकशी समिती नेमली होती. त्यानुसार थेट पद्धतीने झालेल्या खरेदीला आक्षेप घेण्यात आला होता. समितीने काही शिफारशी केल्या होत्या. यंदा वारकºयांना ताडपत्री देण्याचा निर्णय झाला. त्यावर विरोधी पक्षाने ताडपत्रीची वाढीव दराने खरेदी
केली, निविदा प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविली, असा आरोप
केला होता. दराबाबत आक्षेप
घेण्यात आला होता. त्यानंतर स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी ताडपत्री प्रकरणी चौकशी करावी, असे आदेश दिले होते.