उद्योगनगरीत वाहनचोरीचे सत्र सुरूच 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 05:00 PM2019-11-16T17:00:26+5:302019-11-16T17:00:37+5:30

विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल; चोरटे अद्याप फरारच

Vehicle theft sessions started in the pimpri city | उद्योगनगरीत वाहनचोरीचे सत्र सुरूच 

उद्योगनगरीत वाहनचोरीचे सत्र सुरूच 

googlenewsNext
ठळक मुद्देतळेगाव येथून दुचाकी चोरली

पिंपरी : शहर परिसरात वाहनचोरीचे सत्र सुरूच आहे. दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची चोरी चोरट्यांकडून होत आहे. लाखो रुपयांच्या वाहनांची चोरी होत आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध पोलीस ठाण्यांमध्ये वाहनचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम भगवान तोडकर (वय २३, रा. यमुनानगर, निगडी, मूळगाव मंगरुळ, ता. आष्टी, जि. बीड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम यांची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी १० नोव्हेंबर रोजी निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली पार्क केली होती. वाहनचोरीचा दुसरा प्रकार वाकड येथे घडला. याप्रकरणी निखिल ज्ञानेथर फेगडे (वय २७, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. १४) फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल यांची ५० हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. वाहचोरीचा तिसरा प्रकार पिंपरीतील मोरवाडी येथे घडला. याप्रकरणी अमित विजय भाटकर (वय ४२, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अहे. अमित यांचे मोरवाडी, पिंपरी येथे वाहनांचे वॉशिंग सेंटर आहे. त्यांचे ग्राहक रितेशकुमार युवराज सूर्यवंशी यांनी त्यांची साडेसात लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन अमित यांच्या वॉशिंग सेंटरमध्ये बुधवारी (दि. १३) सायंकाळी 
सहाच्या सुमारास वॉशिंगसाठी दिली. त्यानंतर काही वेळेतच अज्ञात चोरट्यांनी अमित त्यांची नजर चुकवून कार चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
वाहनचोरीचा चौथा प्रकार नेरे, दत्तवाडी येथे घडला. याप्रकरणी शिवरंजन सत्यरंजन घठक (वय २३, रा. नेरे, दत्तवाडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिवरंजन यांनी त्यांची २० हजार रुपये किमतीची ही दुचाकी बुधवारी (दि. १३) रात्री दहाच्या सुमारास सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हा प्रकार गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
.........
तळेगाव येथून दुचाकी चोरली
गुलाब व्यंकटी पवार (वय ३४, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे. गुलाब यांनी त्यांची २० हजार रुपये किमतीची दुचाकी मंगळवारी (दि. १२) रात्री नऊच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील परूळेकर हायस्कूलसमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी रात्री त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार बुधवारी (दि. १३) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
 

Web Title: Vehicle theft sessions started in the pimpri city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.