दौऱ्यांवर कशासाठी हवी उधळपट्टी?
By admin | Published: September 17, 2015 02:44 AM2015-09-17T02:44:02+5:302015-09-17T02:44:02+5:30
महापौर स्पेन आणि काही नगरसेवक दक्षिण भारत दौऱ्यावर जाणार आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही उधळपट्टी कशासाठी, असा प्रश्न शहरातील सामान्य नागरिक
पिंपरी : महापौर स्पेन आणि काही नगरसेवक दक्षिण भारत दौऱ्यावर जाणार आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही उधळपट्टी कशासाठी, असा प्रश्न शहरातील सामान्य नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते विचारत आहेत. महापालिकेच्या खर्चातून असे दौरे करू नयेत. स्वत:च्या खर्चातून करावेत, अशी मागणी होत आहे.
महापालिका स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या सभेत दौऱ्यांसदर्भातील खर्चाच्या ऐनवेळच्या विषयास मान्यता देण्यात आली. महापौरांचा स्पेन दौरा दाखवून पंधरा लाखांचा खर्चाचा सदस्य प्रस्ताव मंजूर केला आहे.
स्पेन येथील बर्सिलोना या शहरात स्मार्ट सिटी वर्ल्ड काँग्रेस २०१५ ही परिषद होणार असून, त्यात महापौर शकुंतला धराडे शहराचे प्रतिनिधित्व करणार आहे. तसेच पर्यावरण समितीचे तेरा नगरसेवकही दक्षिण भारताच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. नागरिकांच्या पैशांतून विकासकामे करावीत, दौऱ्यांवर उधळपट्टी करू नये, अशी मागणी शहरातील सुजान नागरिकांकडून होत आहे. महापौर शकुंतला धराडे म्हणाल्या, ‘‘स्पेन शहराचे निमंत्रण आल्याने शहराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जाणार आहे. या दौऱ्यासाठी पंधरा लाख रुपये खर्च कसा, असा प्रश्न मलाही पडला आहे.’’ (प्रतिनिधी)