शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

दौऱ्यांवर कशासाठी हवी उधळपट्टी?

By admin | Published: September 17, 2015 2:44 AM

महापौर स्पेन आणि काही नगरसेवक दक्षिण भारत दौऱ्यावर जाणार आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही उधळपट्टी कशासाठी, असा प्रश्न शहरातील सामान्य नागरिक

पिंपरी : महापौर स्पेन आणि काही नगरसेवक दक्षिण भारत दौऱ्यावर जाणार आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही उधळपट्टी कशासाठी, असा प्रश्न शहरातील सामान्य नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते विचारत आहेत. महापालिकेच्या खर्चातून असे दौरे करू नयेत. स्वत:च्या खर्चातून करावेत, अशी मागणी होत आहे.महापालिका स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या सभेत दौऱ्यांसदर्भातील खर्चाच्या ऐनवेळच्या विषयास मान्यता देण्यात आली. महापौरांचा स्पेन दौरा दाखवून पंधरा लाखांचा खर्चाचा सदस्य प्रस्ताव मंजूर केला आहे. स्पेन येथील बर्सिलोना या शहरात स्मार्ट सिटी वर्ल्ड काँग्रेस २०१५ ही परिषद होणार असून, त्यात महापौर शकुंतला धराडे शहराचे प्रतिनिधित्व करणार आहे. तसेच पर्यावरण समितीचे तेरा नगरसेवकही दक्षिण भारताच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. नागरिकांच्या पैशांतून विकासकामे करावीत, दौऱ्यांवर उधळपट्टी करू नये, अशी मागणी शहरातील सुजान नागरिकांकडून होत आहे. महापौर शकुंतला धराडे म्हणाल्या, ‘‘स्पेन शहराचे निमंत्रण आल्याने शहराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जाणार आहे. या दौऱ्यासाठी पंधरा लाख रुपये खर्च कसा, असा प्रश्न मलाही पडला आहे.’’ (प्रतिनिधी)