पिंपरी : आई माझा मित्र सहलीला जाणार आहे; पण शिक्षक मला सहलीला न्यायला तयार नाहीत, असे का? असे प्रश्न सहलीसाठी मेडिकल अनफिट असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पालकांना विचारले जातात. यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असून, अशा विद्यार्थ्यांनाही सहलीचा आनंद लुटता यावा, यासाठी सहलीसोबत वैद्यकीय पथक नेमावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे.विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक, विकासात्मक ज्ञानात भर पडेल अशा शैक्षणिक, अभ्यासात्मक, संशोधनात्मक स्थळी सहलीचे आयोजन केले जाते. मात्र, सहलीसाठी जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळांपुढे मोठा प्रश्न निर्माण होतो. दरम्यान, वर्गातील मित्रांसमवेत सहलीला जाणे सर्वच विद्यार्थ्यांना आवडते. मात्र, मेडिकल अनफिट असल्यास विद्यार्थ्याला सहलीला नेले जात नाही. दमा, फीट यासारखे आजार असणाºया विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीपासून दूर राहावे लागते.पालकांचे संमतीपत्र आवश्यकसहलीसोबत प्रथमोपचार पेटी असावी, स्थानिक डॉक्टरांचे तसेच ज्या ठिकाणी सहल जाणार आहे तेथील शासकीय रुग्णालयांचे संपर्क क्रमांक सोबत ठेवावेत. विद्यार्थी व पालकांकडून संमतीपत्रक घेणे बंधनकारक आहे. यासह सहली नेताना आरटीओने मान्य केलेल्या वाहनांतूनच सहली घेऊन जाव्यात.सहलीसाठी शाळांची कागदपत्रेप्राचार्यांचे शिफारस पत्र, हमीपत्र, सही-शिक्क्यासह विद्यार्थ्यांची यादी, ठिकाणाबाबतची माहिती, संस्था व्यवस्थापनाचे परवानगी पत्र, बसबाबत माहिती, विद्यार्थ्यांच्या यादीसह आरटीओ पासिंग परवाना, विद्यार्थ्यांच्या विम्याच्या प्रती, पालक व विद्यार्थ्यांचे संमतीपत्र, विद्यार्थ्यांच्या रक्तगटाबाबतची माहिती, विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र.सोबतचा मित्र सहलीला जात असताना मेडिकल अनफिटच्या कारणावरून आपणास सहलीला जाता न आल्यास त्या विद्यार्थ्याचे मानसिक खच्चीकरण होते. त्यामुळे मेडिकल अनफिट असलेल्या विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता सहलीसोबत वैद्यकीय पथक असणे गरजेचे आहे.- डॉ. सुरेंद्र मोरेकाही विद्यार्थी मेडिकल अनफिट असले, तरीही त्यांचा सहलीत समावेश करता येऊ शकतो. मात्र, त्यासाठी पालकांचे संमतीपत्र हवे. तसेच संबंधित विद्यार्थ्याची वैद्यकीय माहिती असणे आवश्यक आहे. डॉक्टरांचे क्रमांक सोबत ठेवलेले असतात.- सूर्यकांत भसे, प्राचार्य,ज्ञानदीप विद्यालय, रुपीनगर
शिक्षक मला सहलीला न्यायला का तयार नाहीत? विद्यार्थ्यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 1:21 AM