जाागतिक संग्रहालय दिन : पिंपरी चिंचवडमधील प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण रखडले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 12:51 PM2019-05-18T12:51:21+5:302019-05-18T12:58:29+5:30

चिंचवडच्या संभाजीनगर येथे १९८९ मध्ये प्राणीसंग्रहालयाची पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारणी केली.

world Museum Day : Renewal of Zoos in Pimpri Chinchwad stop | जाागतिक संग्रहालय दिन : पिंपरी चिंचवडमधील प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण रखडले

जाागतिक संग्रहालय दिन : पिंपरी चिंचवडमधील प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण रखडले

googlenewsNext
ठळक मुद्देनिसर्ग कवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान व प्राणिसंग्रहालय : दुसऱ्या टप्प्यातील काम ठप्पनिरीक्षण नोंदविल्यानुसार सस्तन प्राणी येथून हलविण्याचा निर्णय विकास आराखड्यानुसार विस्तारीकरणाचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होऊन ऑक्टोबर २०१८ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित

नारायण बडगुजर 
पिंपरी : महापालिकेतर्फे चिंचवडच्या संभाजीनगर येथील निसर्ग कवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान व प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. यातील पहिल्या टप्प्यातील कामे मार्गी लागली असली, तरी दुसºया टप्प्यातील कामे रखडली आहेत. कामाची मुदत उलटून सात महिने झाले, तरीही काम ठप्प आहेत. 
प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी महापालिकेने विकास आराखडा तयार करून तो केंद्र शासनाच्या प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे पाठविला. या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी प्राणिसंग्रहालयाची पाहणी केली. त्यांनी निरीक्षण नोंदविल्यानुसार सस्तन प्राणी येथून हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सर्पालय आणि पक्ष्यालय म्हणून या उद्यानाचा विकास करण्यास त्यांनी परवानगी दिली. त्यानंतर विकास आराखड्यानुसार विस्तारीकरणाचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. या कामासाठी तरतूदही करण्यात आली. 
पहिल्या टप्प्यातही स्थापत्यविषयक कामांचा समावेश होता. प्राणिसंग्रहालयासाठी प्रशासकीय इमारत व  कर्मचाऱ्यांच्या वास्तव्यासाठी खोल्या, अंतर्गत पादचारी मार्ग, स्वच्छतागृह यासह सर्पालय, मगर आणि सूसर यांच्यासह पक्ष्यांसाठी स्वतंत्र कक्ष आदी कामांचा यात समावेश आहे. २०१७ मध्ये ही कामे झाली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होऊन ऑक्टोबर २०१८ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र निधी उपलब्ध होत नसल्याने काम रखडले आहे. या कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने कामाचे आदेश देण्यात आलेले नाहीत. आचारसंहिता संपल्यानंतर त्याबाबत कार्यवाही होईल.
..........
पर्यटकांसह शालेय विद्यार्थ्यांची भेट
चिंचवडच्या संभाजीनगर येथे १९८९ मध्ये प्राणीसंग्रहालयाची पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारणी केली. १ जानेवारी १९९० रोजी उद्यान नागरिकांसाठी खुले झाले. सुमारे नऊ एकरातील या उद्यानात चारशे चौरस मीटर हिरवळ, ४६३ झाडे, ६६ सरपटणारे तर १२ सस्तन प्राणी तसेच ६८ पक्षी त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी विविध खेळणी होती. विविध प्राणी व पक्षी पाहण्यासाठी पर्यटक आणि शालेय विद्यार्थी या प्राणीसंग्रहालयाला भेट देत.   
.......

Web Title: world Museum Day : Renewal of Zoos in Pimpri Chinchwad stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.