Bihar Assembly Election 2020: रालोआपासून दूर गेलेल्या चिराग यांच्या पोस्टरवर मोदींचे छायाचित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 01:25 AM2020-10-09T01:25:50+5:302020-10-09T06:52:28+5:30

Bihar Assembly Election 2020: ‘हम बिहार देखेंगे, मोदीजी हिंदुस्थान’ : बिहारमध्ये ‘अजब प्रेम की, गजब कहानी’

Bihar Assembly Election 2020 ljp uses pm modis photo on poster slams cm nitish kumar | Bihar Assembly Election 2020: रालोआपासून दूर गेलेल्या चिराग यांच्या पोस्टरवर मोदींचे छायाचित्र

Bihar Assembly Election 2020: रालोआपासून दूर गेलेल्या चिराग यांच्या पोस्टरवर मोदींचे छायाचित्र

Next

- एस.पी. सिन्हा 

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत ‘अजब प्रेम की, गजब कहानी’ पाहायला मिळत आहे. जदयु आणि भाजप यांच्यापासून दूर होत लोजपा मैदानात उतरली आहे; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेमाचा मोह काही केल्या कमी होताना दिसत नाही. लोजपा सातत्याने पंतप्रधान मोदी यांच्या नावाचा वापर करताना दिसत आहे.

चिराग पासवान हे बिहारमध्ये रालोआपासून वेगळे झाल्यानंतरही भाजपसोबत सरकार बनवू पाहत आहेत. चिराग पासवान हे स्वत:ला भाजपच्या जवळचे असल्याचे सांगतात. मात्र, भाजपने स्पष्ट केले आहे की, रालोआशिवाय कोणीही पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र वापरू नये; अन्यथा त्यांच्याविरुद्ध रीतसर तक्रार दिली जाईल.

लोजपाने बुधवारीच २९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात भाजपच्या चार मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान म्हणतात की, पंतप्रधान मोदी देशाचे नेते आहेत आणि आमचेही नेते आहेत.

हम बिहार देखेंगे, मोदीजी हिंदुस्थान देखेंगे
सोशल मीडियावर एक पोस्टर सध्या पाहायला मिळत आहे. ‘हम बिहार देखेंगे, मोदीजी हिंदुस्थान देखेंगे’, अशी घोषणा व्हायरल होत आहे. यावर चिराग पासवान आणि रामविलास पासवान यांच्यासोबत पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र आहे. अर्थात, भाजपकडून लोजपाला स्पष्ट सांगण्यात आले आहे की, त्यांनी मोदी यांचे छायाचित्र वापरू नये.

नोकरीही गेली अन् तिकीटही नाही
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून वादास सुरुवात झाल्यापासून बिहार पोलिसांचे तत्कालीन डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचे नाव बरेच चर्चेत होते.
निवडणूक जवळ येताच गुप्तेश्वर पांडे यांनी पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा देत थेट राजकारणात उडी घेतली होती. मात्र, पांडे यांना निवडणुकीचे तिकीट मिळाले नाही. नोकरीही गेली अन् तिकीटही मिळाले नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे.
निराश झालेल्या चाहत्यांना गुप्तेश्वर पांडे यांनी फेसबुकवरून संयम बाळगण्याचे आवाहन केलेय. गुप्तेश्वर पांडे यांना वाल्मीकीनगर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात येण्याची शक्यता आहे.

Web Title: Bihar Assembly Election 2020 ljp uses pm modis photo on poster slams cm nitish kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.