Bihar Assembly Election Results: नितीश कुमार यांचं मुख्यमंत्रिपद जाणार?; भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

By कुणाल गवाणकर | Published: November 10, 2020 03:14 PM2020-11-10T15:14:11+5:302020-11-10T15:22:04+5:30

Bihar Assembly Election Results: बिहारमध्ये भाजपची सर्वात मोठा पक्ष होण्याकडे वाटचाल सुरू

Bihar Assembly Election Results nitish kumar will be our cm says bjp bihar president sanjay jaiswal | Bihar Assembly Election Results: नितीश कुमार यांचं मुख्यमंत्रिपद जाणार?; भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Bihar Assembly Election Results: नितीश कुमार यांचं मुख्यमंत्रिपद जाणार?; भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Next

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. सध्या भारतीय जनता पक्ष राज्यातला क्रमांक एकचा पक्ष होण्याकडे वाटचाल करत आहे. तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाला (जेडीयू) मोठा फटका बसला आहे. जेडीयूला सध्या ५० पेक्षा कमी जागांवर आघाडी आहे. गेल्या निवडणुकीत जेडीयूनं ७१ जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदा त्यांना मोठं नुकसान होताना दिसत आहे. भाजपनं जास्त जागा जिंकल्यानं मुख्यमंत्रिपद कोणाला याचीही चर्चा जोर धरू लागली आहे. 

मोदींच्या 'हनुमाना'चा मित्रपक्षाला फटका; भाजपमुळे जेडीयूला अर्धा डझनचा झटका?

भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला निवडणुकीत भाजपाने पुढे केले होते, संध्याकाळ पर्यंत बिहारमध्ये सरकार स्थापन करणे आणि नेतृत्वाबाबत निर्णय केला जाईल. मात्र त्यांच्या या विधानावरून भाजपा राज्यात मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबद्दल फेरविचार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिहारमध्ये नितीश कुमारांना दिलेले आश्वासन भाजपा पाळणार का? हे पाहणे गरजेचे आहे.

भाजपच्या राजकारणानं मुख्यमंत्री नितीश कुमार घायाळ; मित्रपक्षावरच भाजपचा बाण?

भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष संजय जायसवाल यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील, असं जायसवाल म्हणाले. आम्ही निवडणूक निकालाचा अभ्यास करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नितीश कुमारच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबद्दल प्रश्नच निर्माण होत नाही, असं जायसवाल यांनी स्पष्ट केलं आहे.

बिहारमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष, NDA बहुमताच्या पुढे

राज्यात भाजप मोठा पक्ष ठरल्यानं पक्षातून मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरला जाऊ शकतो. आता भाजप मोठा भाऊ ठरल्यानं राज्यातील नेते मुख्यमंत्रिपदासाठी आक्रमक पवित्रा घेतला जाऊ शकतात. त्यामुळेच येत्या काही दिवसांत बिहारमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नितीश कुमार जरी मुख्यमंत्री झाले, तरीही त्यांच्या सरकारवर भाजपचा वरचष्मा राहील, अशी दाट शक्यता आहे. नितीश यांच्या सरकारमध्ये भाजप अनेक महत्त्वाची खाती पदरात पाडून घेऊ शकतो.

Web Title: Bihar Assembly Election Results nitish kumar will be our cm says bjp bihar president sanjay jaiswal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.