शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

पुढे काय? दाऊदला पालिकेचे टेंडर अन् पाकिस्तानसोबत टक्केवारी?; भाजपानं शिवसेनेला डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 12:22 PM

निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देनिवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेनेला जनता माफ करणार नाहीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून हुकूमशाही करत आहेत भाजपा आमदार अतुल भातखळकर आणि आशिष शेलारांचा शिवसेनेवर निशाणा

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पेटला असताना आता शिवसेनेविरोधात नवा वाद निर्माण झाला आहे. एका माजी नौदलाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेवर चहुबाजूने टीका होऊ लागली आहे. नौदलाच्या अधिकाऱ्याला शिवसेनेच्या ८ ते १० कार्यकर्त्यांनी बेदम मारलं, त्यात त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली. या प्रकरणी पोलिसांनी ६ जणांना अटक केली होती त्यांना जामीनही मिळाला आहे.

या प्रकरणी भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेत, याकुबच्या फाशीला विरोध करणारे मुंबईचे पालकमंत्री टायगर मेमनचे घर तोडले नाही, पण कंगणाचे घर तोडलेत. आता देशासाठी लढलेल्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला अमानुष मारहाण केली त्याचा निषेध आहे. पुढे काय? दाऊदला पालिकेचे टेंडर आणि पाकिस्तान सोबत टक्केवारी? असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला आहे.

तर निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेनेला जनता माफ करणार नाही, साठी उलटलेल्या अधिकाऱ्याला सहा जण मिळून मारहाण करतात यांना भामटे नाही तर काय म्हणावं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून हुकूमशाही करत आहेत असा टोला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

काय आहे प्रकरण?

कांदिवलीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एका माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली. या प्रकरणी शिवसेनेचे कार्यकर्ते कमलेश कदम यांच्यासह ८ ते १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ६५ वर्षाच्या मदन शर्मा नावाचे माजी नौदल अधिकारी कांदिवली पूर्व येथे ठाकूर कॉम्प्लेक्स येथे राहतात.

शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं एक कार्टून एका व्हॉट्सअप ग्रुपमधून सोसायटीच्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड केले. यानंतर कमलेश कदम नावाच्या व्यक्तिचा मला फोन आला. त्यांनी माझं नाव आणि पत्ता विचारला. दुपारी ते लोक बिल्डींग खाली आले त्यांनी मला खाली बोलावलं. बिल्डींगच्या गेटवर ८ ते १० जणांनी मला बेदम मारहाण केली. ही घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मा यांनी याबाबत समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कमलेश कदमसह ८ ते १० जणांवर कलम ३२५, १४७, १४९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कमलेश कदमसह ३ जणांना अटक करण्यात आली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबाबत ट्विटरवरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, ही घटना अतिशय धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे. केवळ व्हॉट्सअपवर आलेला मेसेज फॉरवर्ड केल्याने माजी नौदल अधिकाऱ्याला या गुंडांनी मारले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अशा घटना रोखल्या पाहिजेत. या गुंडावर कठोर कारवाई करुन त्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाDawood Ibrahimदाऊद इब्राहिम