मुंबई: गेल्या महिन्यात MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती मिळाली नाही. शेवटी नैराश्यामुळे पुण्यातील एका मुलाने आत्महत्या केली होती. यावरून ठाकरे सरकारवर भाजपसह अन्य विरोधी पक्षांची चांगलीच टीकेची झोड उठवली होती. यानंतर ३१ जुलैपर्यंत एमपीएससीद्वारे राज्यातील रिक्त जागा भरू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. यावरून पुन्हा एकदा भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधला असून, MPSC पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांकरिता तरी केंद्र सरकारकडे बोट दाखवू नका, असा खोचक टोला लगावला आहे. (bjp gopichand padalkar criticises ncp rohit pawar and thackeray govt over mpsc)
गेल्या अनेक दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांवर टीका करताना दिसत आहेत. MPSC च्या नियुक्त्या रखडल्याप्रकरणी गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीय आणि ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
Adani Group चा आता महाराष्ट्र, छत्तीसगडमधील खाणींवर ताबा; लिलावात सर्वाधिक बोली!
दुसऱ्यांच्या पाल्यांचे भविष्य अंधारात लोटू नका
आपल्या घरगुती वादात, दुसऱ्यांच्या पाल्यांचे भविष्य अंधारात लोटू नका. ‘प्रशासकीय वचक’ आहे म्हणून स्वत:चंच तुणतुण वाजवायचं.. आणि MPSC सदस्यांच्या नियुक्त्यालाच ३० दिवस लावायचे तर MPSC पात्र उमेदवारांच्या नियुक्त्या कधी? कृपया याकरिता केंद्र सरकारकडे बोट दाखवू नका, या शब्दांत हल्लाबोल करत, नीट वाचता न येणाऱ्या आमदार रोहित पवारांनी केंद्रावर नुसते सल्ले देण्याचे उद्योग बंद करावे, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
राजभवनामुळे लबाडी उघड
रोहित पवारांनी सांगितले होते, पण आता तारीख उलटून गेली. लबाडी करण्यात हे माहीर आहेत, ते स्वत:च यावर वारंवार शिक्कामोर्तब करत आहेत. एमपीएससी आयोगाच्या सदस्य नेमणुकीच्या बाबतीत राज्यपालांना ३१ जुलैआधी याद्या पाठवल्याचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले. मात्र राजभवनमधून २ ऑगस्ट रोजी याद्या आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे हे सर्व किती लबाडी करतात, हे सिद्ध झाले आहे, असे पडळकर म्हणाले.
काय सांगता! वय वर्षे १२ अन् जेवणात खातो तब्बल ४० चपात्या; डॉक्टरही चक्रावले
दरम्यान, ३१ जुलैपर्यंत राज्यातील रिक्त जागा एमपीएससीद्वारे भरू, अशी घोषणा अजित पवारांनी सभागृहात केली होती. पण, सभागृहातून बाहेर पडताच त्यांनी शब्द फिरवला. खोटे बोलत अजित पवारांनी सभागृहाची दिशाभूल केली. त्यामुळे या सरकारला MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत काहीच देणेघेणे नाही, असे वाटते. या प्रस्थापितांच्या सरकारला फक्त आपल्याच पोराबाळांच्या आमदारकी, खासदारकीचे पडले आहे. बाकी किती स्वप्नील लोणकर येतील जातील याविषयी त्यांना काहीही पडलेले नाही, असा घणाघात पडळकर यांनी यापूर्वी केला होता.