पोलीस यंत्रणेचे कधी नव्हे तेवढे खच्चीकरण ठाकरे सरकारच्या काळात; आशिष शेलार यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 01:55 PM2021-08-04T13:55:31+5:302021-08-04T13:56:26+5:30

Ashish Shelar : राज्यातील आघाडी सरकार शेतकऱ्यांचे रक्षणकर्ते नसून अनेक घोटाळेबाज धर्मभास्कर वाघांचे आश्रयदाते, शेलार यांची टीका.  

bjp leader ashish shelar criticize thackeray mahavikas government over various issues in maharashtra | पोलीस यंत्रणेचे कधी नव्हे तेवढे खच्चीकरण ठाकरे सरकारच्या काळात; आशिष शेलार यांचा आरोप 

पोलीस यंत्रणेचे कधी नव्हे तेवढे खच्चीकरण ठाकरे सरकारच्या काळात; आशिष शेलार यांचा आरोप 

Next
ठळक मुद्देराज्यातील आघाडी सरकार शेतकऱ्यांचे रक्षणकर्ते नसून अनेक घोटाळेबाज धर्मभास्कर वाघांचे आश्रयदाते, शेलार यांची टीका.  

राज्यातील आघाडी सरकार शेतकऱ्यांचे रक्षणकर्ते नसून अनेक घोटाळेबाज धर्मभास्कर वाघांचे आश्रयदाते आहेत, अशा घणाघाती शब्दात भाजप नेते आमदार अॅड आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर धुळे येथील पत्रकार परिषदेत हल्ला चढवला. आमदार अँड आशिष शेलार हे तीन दिवसांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज धुळे येथे संघटनात्मक बैठका घेतल्या नंतर पत्रकार परिषद घेऊन आघाडी सरकारवर निशाणा साधला. पोलीस यंत्रणेचे कधी नव्हे तेवढे खच्चीकरण ठाकरे सरकारच्या काळात झाले, असल्याचे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली.

धुळे जिल्हा परिषदेतील कोटय़वधींच्या अपहारप्रकरणाचा मुख्य सुत्रधार धर्मभास्कर वाघ याची राज्यातील जनतेला सतत आठवण व्हावी आणि घोटाळ्यां मध्ये धर्मभास्करचे बाप निघावेत असे एक एक घोटाळेबाज चेहरे ठाकरे सरकारच्या काळात उघड होत आहेत. धर्मभास्कर म्हणेल बाप रे बाब! असे चित्र सध्या असल्याचे शेलार म्हणाले. "पोलीस यंत्रणेचे कधी नव्हे तेवढे खच्चीकरण ठाकरे सरकारच्या काळात झाले. अधिकऱ्यांमध्ये वाँर सुरु आहे. बार, पब, डिस्को, लेडीज बार आणि काळे धंदे राजरोस पणे सुरु आहेत.  दलालांमार्फत बदलत्या आणि बदल्यांची दलाली घेणे सुरू आहे. आता चाईल्ड प्रोनोग्राफी सारखे भयंकर प्रकार उघड होत आहेत," असंही त्यांनी नमूद केलं.

प्रशासकीय यंत्रणा कोलमडली
दुसरीकडे सरकारची प्रशासकीय यंत्रणा कोलमडली आहे. अनेक आएएस दर्जाचे वरिष्ठ अधिकारी अनेक दिवस नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत तर सतत बदल्या करुन अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करण्यात आले आहे. तीन कारभारी आणि रोज बदला अधिकारी अशी राज्यात स्थिती पहायला मिळते असल्याचं शेलार यांनी सांगितलं. "प्रशासनावर  कुणाची पकड नाही. अधिकारी मंत्र्यांना जुमानत नाही. भ्रष्टाचार बोकाळला आहे. बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असल्याचे  उघड होते आहेत.तर बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला आहे एकिकडे राज्यात कोरोना, पाऊस, वादळ अशा आपत्तींनी थैमान घातले आहे, अशावेळी प्रशासनामध्ये यादवी माजली आहे. कुणाचे कोण ऐकत नाही.  राज्य शासनाच्या दिशाहीन कारभारामुळे राज्याची दिशा कोणती हे कळत नाही असे चित्र आहे. सत्तेतील तीन पक्ष एकमेकांशी भांडतात. एकमेकांच्या पक्ष प्रमुखांविषयी वक्तव्य येतात , त्यावरून वाद होतात तीनही पक्षांमध्ये बेदली माजलेली आहे या बेदलीमुळे नेतृत्वाची बेअदबी ते करीत आहेत," असंही ते म्हणाले. 

शेतकरी, कामगार, श्रमिक, अलुतेदार, बलुतेदार,  मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण अशा जनतेच्या कुठल्याही प्रश्नाला न्याय मिळत नाही. म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जनतेमध्ये जातो आहोत. जनतेचा आवाज बनतो आहोत.  या सरकार विरोधात ऐल्गार आम्ही करु, असेही शेलार यांनी सांगितले.

विमानतळावर टक्केवारीच आंदोलन
शिवसेने केलेल्या आंदोलनाच्या प्रश्नावर उत्तर देताना आशिष शेलार म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ  हे नाव भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्या पुढाकाराने देण्यात आले. आज जे बोलत आहेत तेव्हा पाळण्यात होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला धक्का लावल्यास भाजप विरोध करेल." 

मात्र हस्तांतरणाचा ठराव कँबिनेटमध्ये कोणी मंजूर केला? ठाकरे सरकारनेच ना मग बाहेर आंदोलन कशाला ?  ठरावाच्या वेळी नाव, अटी शर्ती याची काळजी का घेतली नाही ?  जे नावब मलिक याबाबत आज बोलत आहेत ते सरकार मध्ये आहेत. मग अदानीच्या विरोधात कारवाई का करित नाहीत?  अदानीं कंपनीला विमानतळ हस्तांतरण करणारा जो ठराव ठाकरे सरकारने मंजूर केला तो मग रद्द का करित नाहीत? ते धाडस नवाब मलिक दाखवतील काय? आतून सपोर्ट आणि बाहेरून विरोध असे सध्या सुरू आहे. अदानींचे सरकार मधील कुणाशी संबंध आहेत हे आता महाराष्ट्राला सर्वश्रुत आहेत. त्यामुळे विरोध पण आपणच करायचा आणि समर्थन ही द्यायच अशी शिवसेनेची टक्केवारीसाठी चाललेली आंदोलन असल्याचा आरोप शेलार यांनी केला. 

Web Title: bjp leader ashish shelar criticize thackeray mahavikas government over various issues in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.