अजित पवार साहेब, ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद जाईल ना, त्या दिवशी...; राणेपुत्राचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 03:32 PM2021-04-23T15:32:18+5:302021-04-23T15:36:10+5:30

भाजपचेही कितीतरी आमदार, आजी-माजी नेते दररोज भेटतात. तेही दिवसभर फोन करतात, असं वक्तव्य पवार यांनी केलं होतं.

bjp leader nilesh rane slams deputy cm ajit pawar over his comment he meets bjp leaders | अजित पवार साहेब, ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद जाईल ना, त्या दिवशी...; राणेपुत्राचा टोला

अजित पवार साहेब, ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद जाईल ना, त्या दिवशी...; राणेपुत्राचा टोला

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपचे नेते तुमच्याकडे नाही उपमुख्यमंत्र्यांकडे येतात, राणे यांचं वक्तव्यभाजपचेही कितीतरी आमदार, आजी-माजी नेते दररोज भेटतात. तेही दिवसभर फोन करतात, असं वक्तव्य पवार यांनी केलं होतं.

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची वाढ होत आहे. तर दुसरीकडे आरोग्यसुविधांवरही मोठा ताण येत आहे. अशा परिस्थितीत विरोधकांकडून सत्ताधाऱ्यावर निशाणा साधण्यात येत आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात सत्ताधारी अपयशी ठरल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नॉट रिचेबल असताता असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यानंतर अजित पवार यांनी त्यांना उत्तरही दिलं होतं. दरम्यान, आता यामध्ये भाजपचे नेते नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी उडी घेत उपमुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. 

"अजित पवार म्हणतात माझ्याकडे किती भाजपचे आमदार येतात ते पाहा. ते तुमच्याकडे नाही, तर उपमुख्यमंत्र्यांकडे येतात. ज्या दिवशी उपमुख्यमंत्रीपद जाईल त्यादिवशी आमदार सोडा नारळ पाणी विकणारा पण येणार नाही तुमच्याकडे. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात विचार करून बोललं पाहिजे," असं म्हणत निलेश राणे यांनी अजित पवारांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून अजित पवारांवर निशाणा साधला. 



काय म्हणाले होते अजित पवार?

“अजित पवार जनतेच्या, जनप्रतिनिधींच्या नेटवर्कमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. न्यूज चॅनलच्या पडद्यावर दिसण्यासाठी अभिनय करणाऱ्या, खोट्या प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही. दररोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाहीत, अशी मंडळी अलिकडे माझ्यावर दररोज आरोप करत आहेत," असं म्हणत उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला होता.

“दररोज सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्ष भेटीसाठी मी सर्वांना उपलब्ध असतो. मुख्यमंत्री, मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी सर्वांशी दिवसभर संपर्क, संवाद सुरु असतो. भाजपचेही कितीतरी आमदार, आजी-माजी नेते दररोज भेटतात. तेही दिवसभर फोन करतात. मंत्रालयात सोमवार ते गुरुवार सकाळी नऊ वाजता मी हजर असतो. पुण्यात शुक्रवार, शनिवारी आणि रविवारी बारामतीत दिवसभर कार्यक्रम सुरु असतात. गेली दीड वर्षे हा कार्यक्रम अखंड सुरु आहे. कायम लोकांच्या सतत संपर्कात राहणारा मी कार्यकर्ता आहे. मंत्रालयात आणि राज्यातील जनतेत मी कायम उपस्थित असताना ‘अजित पवार नेटवर्कबाहेर’चा आरोप करणाऱ्यांचा हेतू व मेंदू तपासून घेण्याची गरज आहे,” असंही पवार म्हणाले होते.
 

Web Title: bjp leader nilesh rane slams deputy cm ajit pawar over his comment he meets bjp leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.