सांगली: गोपीचंद पडळकर आमदार होणार नाहीत तोपर्यंत चपला घालणार अशी शपथ घेतलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. चांदीच्या चपला आणि पॅशन बाईक देऊन कार्यकर्त्यांना गौरवण्यात आलं. याशिवाय एका कार्यकर्त्याच्या वारसाला गाडी भेट देण्यात आली. यावेळी आमदार पडळकर यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आले. (bjp mlc gopichand padalkars volunteers facilitated)"माझ्यासवे लढाया वाघास बोलवा रे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही"गोपीचंद पडळकर जोपर्यंत आमदार होणार नाहीत, तोपर्यंत चप्पल घालणार नाही, असा निश्चिय दत्तात्रय कटरे यांनी २००६ मध्ये केला. तेव्हापासून त्यांनी पायात चप्पल घातली नव्हती. तर नारायण पुजारी यांनी २००९ पासून चपला घातलेल्या नव्हत्या. या दोघांचा चांदीची चप्पल आणि पॅशन गाडी देऊन सत्कार करण्यात आला.कुत्ते भोंकते है... गोपींचंद पडळकरांना लक्ष्य करत जितेंद्र आव्हाडांची 'शायरी'गोपीचंद पडळकर आमदार होईपर्यंत केस-दाढीचे पैसे घेणार नाही, अशी प्रतिज्ञा २००९ मध्ये करणाऱ्या जालिंदर क्षीरसागर यांच्या वारसांनादेखील पॅशन गाडी देण्यात आली. या कार्यक्रमाला गोपीचंद पडळकर यांच्यासह रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, भाजप आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पडळकरांना अश्रू अनावर झाले. गोरे यांचं भाषण सुरू असताना पडळकर यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.“पक्षाची वेठबिगारी करण्यासाठी विनाकारण चमकोगिरी करू नये”; गोपीचंद पडळकरांना सुनावलं
कोण आहेत गोपीचंद पडळकर?गोपीचंद पडळकर धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. आतापर्यंत धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या अनेक आंदोलनाचं नेतृत्व पडळकरांनी केलं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी त्यांनी भाजपला रामराम ठोकून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. त्यांनी जवळपास ३ लाख मतं घेतली. मात्र त्यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. पण बारामतीमध्ये अजित पवारांविरुद्ध लढताना त्यांचं डिपॉजिट जप्त झालं. यानंतर भाजपनं त्यांना विधानपरिषदेवर पाठवलं.