Bihar Election 2020 : "...तर नितीश कुमार गजाआड असतील", चिराग पासवान यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2020 05:45 PM2020-10-25T17:45:32+5:302020-10-25T17:57:58+5:30
Bihar Election 2020 And Chirag Paswan : चिराग पासवान यांनी जेडीयूवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच नितीश कुमार यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली - बिहारच्या पहिल्या टप्प्यातील 71 जागांवर 28 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. बिहारमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. लोक जनशक्ति पार्टीचे (Lok Janshakti Party) नेते चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी रविवारी (25 ऑक्टोबर) सीतामडी आणि बक्सरमध्ये प्रचार रॅली घेतली. यावेळी चिराग पासवान यांनी जेडीयू (JDU) वर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच नितीश कुमार यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. "लोक जनशक्ती पार्टी जर सत्तेत आली तर नितीश कुमार हे गजाआड असतील" असं चिराग पासवान यांनी म्हटलं आहे.
चिराग पासवान यांनी रविवारी एका रॅलीमध्ये "जर आम्ही सत्तेत आलो, तर नितीश कुमार आणि त्यांचे अधिकारी गजाआड असतील" असं म्हटलं आहे. बक्सरच्या डुमरावमधील एका रॅलीला संबोधित करताना त्यांनी सध्याच्या राज्य सरकारवर निशाणा साधत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. बिहारमध्ये दारूबंदी अयशस्वी ठरली आहे. अवैध दारूची मोठ्याप्रमाणावर विक्री होत असल्याचं म्हटलं आहे. नितीश कुमार मुक्त सरकारसाठी लोक जनशक्ती पार्टीने भाजपा समर्थकांकडे देखील मतं मागितली आहेत.
Nitish Kumar will be behind bars if LJP comes to power: Chirag Paswan
— ANI Digital (@ani_digital) October 25, 2020
Read @ANI Story | https://t.co/VghHUvIb0cpic.twitter.com/3AhGGXg1Ut
"मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, ज्या ठिकाणी लोक जनशक्ती पार्टीचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तिथे #बिहार1stबिहारी1st लागू करण्यासाठी लोजपाच्या उमेदवारांना मतदान करा व अन्य सर्व ठिकाणी भाजपाच्या उमेदवारांना मत द्या. येणारे सरकार हे नितीश कुमार मुक्त सरकार असेल" असं चिराग पासवान यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. बिहारमध्ये सध्या प्रचार सुरू आहे. याच दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा भाषणादरम्यान संयम सुटला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
Bihar Election 2020 : "माझ्या सरकारमध्ये एखादे चुकीचे कृत्य केले, कायदा मोडला, तर त्याला थेट तुरुंगात जावे लागते", बिहारमध्ये जोरदार प्रचार सुरूhttps://t.co/yXa8dzEObx#BiharElections2020#BiharElections#NitishKumar#Tejasviyadav
— Lokmat (@MiLOKMAT) October 25, 2020
"तुम्हाला संधी होती, तेव्हा एखादे शाळा-महाविद्यालय उभारले का, हा प्रश्न तुमच्या आई-वडिलांना विचारा" असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. बेगुसरायमध्ये विधानसभा निवडणूक प्रचारासाठी शनिवारी एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नितीश यांनी असं म्हटलं आहे. "इतरांना सरकार बनविण्याची संधी मिळाली. त्यांनी काय केले? एखादे शाळा-महाविद्यालय बांधले का? आज तुम्हाला शिकायचे आहे, तर सरकार असताना शाळा-महाविद्यालय बांधले का, हा प्रश्न तुमच्या आई-वडिलांना विचारा" असं म्हटलं आहे.
Bihar Election 2020 : "बिहारमधील जनता महायुतीच्या 15 वर्षांत भरडली गेली, अनेक तरुण बेरोजगार झाले"https://t.co/nAXz7KqMNK#BiharElections2020#BiharElection#AsaduddinOwaisi#NitishKumar#NarendraModipic.twitter.com/1yBxVgP8WH
— Lokmat (@MiLOKMAT) October 25, 2020
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी बिहारच्या कैमूर जिल्ह्यात घेतलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुकीत जाहीर सभेत पाकिस्तान आणि ओवैसीचं नाव घेतलं जात आहे. बिहारमध्ये आता भाजपला ओवैसी दिसत आहेत असं ओवैसींनी म्हटलं आहे. "नितीश कुमार यांच्याविरोधात भाजपा कट रचत आहे. त्यांना निवृत्त करून भाजपा आमदाराला बिहारचा मुख्यमंत्री करण्याची तयारी सुरू आहे" असं देखील ओवैसी यांनी म्हटलं आहे. कैमूरमध्ये असदुद्दीन ओवैसी यांनी एका सभेला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे. "बिहारमधील जनता महायुतीच्या 15 वर्षांच्या कार्यकाळात भरडली गेली आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कारकिर्दीत अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. ते गरीबीत ढकलले गेले आहेत. उपेंद्र कुशवाह यांना मुख्यमंत्री बनवा. तरच बिहारच्या जनतेला न्याय मिळेल" असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.
अरविंद केजरीवाल यांनी साधला निशाणा, म्हणाले...https://t.co/1G3fq2BfHT#BiharElections2020#coronavirus#CoronavirusVaccine#arvindkejriwalpic.twitter.com/6LoCIxqz9J
— Lokmat (@MiLOKMAT) October 25, 2020