"रश्मी शुक्ला यांना माफ केले; चुकीला माफी नाही, ही शिकवण सरकार विसरले"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 06:00 AM2021-03-26T06:00:42+5:302021-03-26T06:01:49+5:30

शिवाजी महाराजांचे तत्त्व होते, ते चूक झाल्यावर माफी नाही, ही शिकवण राज्य सरकार विसरले. सगळ्या चुका करून रश्मी शुक्ला रडत मुख्यमंत्री, गृहमंत्री, अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांच्याकडे गेल्या

Forgive Rashmi Shukla, this is a mistake; There is no excuse for wrongdoing, this teaching the government forgot | "रश्मी शुक्ला यांना माफ केले; चुकीला माफी नाही, ही शिकवण सरकार विसरले"

"रश्मी शुक्ला यांना माफ केले; चुकीला माफी नाही, ही शिकवण सरकार विसरले"

Next

मुंबई/ठाणे : फोन टॅपिंग प्रकरण उघड झाल्यानंतर रश्मी शुक्ला यांनी ‘‘मै माफी मांगती हूँ, मेरा लेटर वापस दे दो”, अशा शब्दांत माफी मागितली होती. मात्र त्यांना माफी देणे चूकच होते, असे  गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्र परिषदेत सांगितले.
आव्हाड म्हणाले की महाराष्ट्र सरकार शिवाजी महाराजांची शिकवण विसरले. सरकारकडून आपण खूप मोठ्या हृदयाचे आहोत, हे दाखविण्याची चूक झाली.

शिवाजी महाराजांचे तत्त्व होते, ते चूक झाल्यावर माफी नाही, ही शिकवण राज्य सरकार विसरले. सगळ्या चुका करून रश्मी शुक्ला रडत मुख्यमंत्री, गृहमंत्री, अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांच्याकडे गेल्या आणि मला माफ करा म्हणाल्या, तर कोणत्याही व्यक्तीला पाझर फुटतोच. पण हा मोठ्या कटाचा भाग आहे, हे लक्षातच आले नाही”, असा देखील दावा  आव्हाड यांनी केला. 

रश्मी शुक्ला यांच्या कथित अहवालाचा संदर्भ देऊन आव्हाड म्हणाले की चौबे नावाचे अधिकारी कायदा-सुव्यवस्था सह आयुक्त होते.  त्यांचे संबंध थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत असतात. ते कुठल्यातरी नवाज, इंगोलेसोबत बोलतील का? यांनीच माणसे पेरायची प्लांट करायची, यांनीच माणसांना संभाषण करायला लावायचं, यांनीच ते टेप करायचं आणि यांनीच त्याचा वापर बाजारात करायचं, असे हे षडयंत्र असल्याचे आव्हाड म्हणाले.

आमदारांवर रश्मी शुक्लांचा दबाव? 
जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी दुपारी रश्मी शुक्ला यांच्याबाबत एक ट्वीट केलं होतं. “शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर (आताचे राज्यमंत्री) यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपबरोबर रहावे, यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली, त्यांना फोन केले आणि त्यांच्यावर दबाव आणण्याचादेखील प्रयत्न केला होता. अजून काय पुरावे पाहिजेत?”, असा सवाल आव्हाड यांनी ट्विटद्वारे केला.

Web Title: Forgive Rashmi Shukla, this is a mistake; There is no excuse for wrongdoing, this teaching the government forgot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.