युपीएचा विषय केंद्रातला, जिल्हास्तरीय लोकांनी बोलू नये; संजय राऊतांनी दाखवली 'पायरी'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 11:12 AM2021-03-26T11:12:55+5:302021-03-26T11:14:59+5:30
Sanjay raut answer to congress leader nana patoole, sachin sawant: संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते असू शकतात. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. युपीएवर बोलायला युपीएमध्ये आसावेच लागते असे काही नाही. युपीए हा राष्ट्रीय विषय आहे, असे राऊत यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या टीकेवर उत्तर दिले आहे.
राष्ट्रीय स्तरावर एका मजबूत विरोधी आघाडीची स्थापना होणे गरजेचे आहे. हे ज्या राज्यस्तरीय नेत्यांना कळत नाही त्य़ांनी कृपा करून बोलू नये. या विषयावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी बोलले तर ठीक, ते देखील यावर चिंतन करत आहेत, असे प्रत्यूत्तर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसच्या (Congress) राज्यातील नेत्यांना दिले आहे. (Sanjay raut answer to congress leader nana patoole, sachin sawant on UPA statement.)
संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते असू शकतात. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. युपीएवर बोलायला युपीएमध्ये आसावेच लागते असे काही नाही. युपीए हा राष्ट्रीय विषय आहे, असे राऊत यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या टीकेवर उत्तर दिले आहे. कधीकधी लूज बॉलला कॅचही मिळतो, विकेटही पडते, असा टोला राऊतांनी विरोधी पक्षनेते संजय राऊत यांनी लगावला आहे.
ठाकरे सरकार महाराष्ट्रात येत आहे, त्यांच्या सोबत जाऊ नये. तुमच्या फाईल तयार आहेत. यड्रावकरांपासून अनेक आमदारांना रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) धमक्या देत होत्या. हे सर्वांना माहिती होते. भाजपा सरकारसोबत जा, असे इशारे पोलीस खात्याकडून दिले जात होते. शुक्लांना महाविकास आघाडीच्या सरकारने तरीही 6 महिने पदावर ठेवले होते याचे मला आश्चर्य वाटते, असे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.
पोलिस खात्यातील असे चार-पाच अधिकारी आमच्या, शरद पवारांच्या नजरेत आले होते. त्यांच्यावर विश्वास कसा ठेवला असा सवाल राऊतांनी व्यक्त केला. बाळासाहेबांनीदेखील अधिकाऱ्यांच्या मदतीने सरकार चालविता येत नाही, असे सांगितले होते. युतीसरकारच्या काळातही तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींना बाळासाहेबांनी दोन अधिकाऱ्यांना सुटीवर पाठविण्यास सांगितले होते, असेही राऊत म्हणाले. वेळीच या अधिकाऱ्यांना बाजुला केले असते तर देवेंद्र फडणवीस ज्या फाईल घेऊन दिल्लीला गेले होते, ते झाले नसते, असेही राऊतांनी सांगितले.
ममतांच्या प्रचाराला जाण्य़ाचा विचार...
शरद पवार पश्चिम बंगालला जाणार आहेत. माझा विचार आहे जाण्याचा. काँग्रेसने आक्षेप घेतलेला, परंतू पवार हे देशाच्या फायद्याचा त्यांच्या विवेकबुद्धीला पटणारा निर्णय घेतात. यामुळे भाजपाची प्रचार करण्याची पद्धत पाहता ममतांचे हात बळकट करणे गरजेचे आहे, असे राऊत म्हणाले.