कैलास विजयवर्गीय यांचा रिपोर्ट आला; हल्ल्यात हाताचे लिगामेंट फ्रॅक्चर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 03:36 PM2020-12-11T15:36:10+5:302020-12-11T15:39:02+5:30

West bengal Politics News: गुरुवारी नड्डा हे ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या लोकसभा मतदारसंघात डायमंड हार्बरमध्ये जात होते. यावेळी हा हल्ला करण्यात आला होता.

Kailash Vijayvargiya's report came; Ligament fracture of the arm in west Bengal attack | कैलास विजयवर्गीय यांचा रिपोर्ट आला; हल्ल्यात हाताचे लिगामेंट फ्रॅक्चर

कैलास विजयवर्गीय यांचा रिपोर्ट आला; हल्ल्यात हाताचे लिगामेंट फ्रॅक्चर

Next

कोलकाता : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि पश्चिम बंगालचे नेते कैलास विजयवर्गिय यांच्या ताफ्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठमोठे दगड फेकले होते. या हल्ल्यातून नड्डा यांची कार बुलेटप्रूफ असल्याने वाचली होती. मात्र, विजयवर्गीय यांच्या कारचा काचा फोडून हे दगड आतमध्ये घुसले होते. विजयवर्गीय यांनी हे दगड हातांनी थोपवत स्वत:ला वाचविले होते. यामध्ये त्यांना दुखापत झाली होती. याचा रिपोर्ट आला आहे. 


गुरुवारी नड्डा हे ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या लोकसभा मतदारसंघात डायमंड हार्बरमध्ये जात होते. यावेळी हा हल्ला करण्यात आला होता. दगडफेकीच्या घटनेला केंद्र सरकारने गंभीरपणे घेतले असून राज्यपाल जगदीप धनखड़ यांच्याकडून अहवाल मागविला होता. धनखड यांचा अहवाल मिळताच केंद्राने तातडीने बंगालचे डीजीपी आणि मुख्य सचिवांना दिल्लीला बोलवून घेतले असून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे संकेत राज्यपालांनी दिले आहेत. 


लिगामेंट म्हणजे काय? 
हाडे जोडण्यासाठी आणि हालचाल करण्यासाठी लिगामेंट मदत करते. एखाद्या परिस्थितीत लिगामेंटवर भार आला तर ती तुटते. यामुळे खूप वेदना होतात. दुखीच्या भागात सूज आणि वेदना होत असल्याने तेथील भाग हा निळा पडतो. लिगामेंटव उपचार करताना प्लॅस्टरही केले जाते. तसेच ऑपरेशनही केले जाते.


पश्चिम बंगामध्ये राज्यपाल धनखड यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, राज्यात कायदा सुव्यवस्थेची हालत बिघडलेली आहे. पश्चिम बंगालची सुरक्षा करणे माझी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना संविधानाचे पालन करावेच लागणार आहे. कालच्या घटनेबाबत ममता बॅनर्जींनी माफी मागायला हवी. मानवाधिकाराच्या दिवशी मानवाधिकारांचे उल्लंघन करण्यात आले. कालचा हल्ला हा लोकशाहीवरील डाग आहे. लोकशाहीत सर्वांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. 


नड्डांच्या ताफ्यावर हल्ला 
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी भाजपा २०० जागा जिंकेल असे विश्वास व्यक्त केला होता. त्याच्या दुसऱ्या दिवशीच जेपी नड्डांच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. मोठमोठे दगड, सिमेंटचे ब्रिक्स फेकून गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्याने मोठे तणावाचे वातावरण आहे. ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या लोकसभा मतदारसंघात डायमंड हार्बरमध्ये जात होते. भाजपाने आरोप केला की, नड्डा आणि कैलास विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. दक्षिण 24 परगनामध्ये टीएमसी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांचा आरोप आहे की, टीएमसी कार्यकर्त्यांनी भाजपाचे अध्यक्ष नड्डा यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी मोठमोठे दगड फेकले. सुरक्षा दलाने नड्डांच्या कारला सुरक्षित बाहेर काढले. 

Web Title: Kailash Vijayvargiya's report came; Ligament fracture of the arm in west Bengal attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.