कंगनाचा राज्य सरकारवर पुन्हा निशाणा; "गुंडानी बार, रेस्टॉरन्ट खुले केले, मात्र मंदिरे..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 12:39 AM2020-10-14T00:39:30+5:302020-10-14T00:40:22+5:30
Kangana Ranaut News: आता माझ्यावरही खटला दाखल करा. मी जिवंत असेपर्यंत तुम्हाला उघडे पाडीन, असे म्हटले.
नवी दिल्ली : भाविकांसाठी मंदिरे खुली करण्यावरून अभिनेत्री कंगना रनौतने पुन्हा महाराष्ट्र सरकारवर टष्ट्वीट करुन निशाणा साधला. सोमवारीही तिने बॉलीवूडचे काही अग्रणी निर्मात्यांनी दोन टीव्ही चॅनेल्सच्या बेजबाबदार वृत्तांकनावरून दिल्ली हायकोर्टात धाव घेतल्याने बॉलीवूडला गटार संबोधले. मुंबईतील वीज पुरवठा ठप्प झाल्यावरुनही तिने शिवसेनेचे संजय राऊत यांच्यावर तोंडसुख घेतले होते.
‘गुंडा सरकार’ला राज्यपालांनी जाब विचारल्याने आंनद वाटला. सोनिया सेना बाबर सेनेपेक्षाही वाईट वागत आहेत. गुंडानी बार, रेस्टॉरन्ट खुले केले, मात्र मंदिरे बंदच ठेवली, अशा बेताल भाषेत कंगनाने शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारवर हल्ला चढविला.
एकापेक्षा जास्त केलेल्या टिष्ट्वटमध्ये रानौत हिने बॉलिवूडला ‘अमली पदार्थांची, शोषणाची, वशिलेबाजी आणि जिहादची नाली’ म्हटले. ही नाली स्वच्छ न करता तिचे झाकण उघडले गेले आहे. आता माझ्यावरही खटला दाखल करा. मी जिवंत असेपर्यंत तुम्हाला उघडे पाडीन, असे म्हटले.
कंगना रानौत हिने आणखी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले की, मोठे समजले जाणारे नायक (हिरोज) हे महिलेला फक्त वस्तूच समजतात असे नाही तर तरूण मुलींचे शोषणही करतात. हेच हिरो सुशांत सिंह राजपूतसारख्याला वर येऊ देत नाहीत व वयाची पन्नाशी गाठली तरी ते नायकाच्या भूमिका कराव्या वाटतात. मुंबईत सोमवारी वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर रानौत हिने शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा आणि संजय राऊत हे खेळण्यातील बुलडोझरसह असल्याचे छायाचित्र टिष्ट्वटरवर टाकले.