धन्यवाद काँग्रेस, आमच्या डोक्याचा ताप आता तुम्ही घेणार, जेटलींचा शत्रुघ्न सिन्हांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 08:19 PM2019-03-29T20:19:14+5:302019-03-29T20:20:42+5:30

बिहारच्या पटना-साहिबचे खासदार आणि भाजपाचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

lok sabha election 2019 thanks congress for accepting bjp problem says finance minister arun jaitley | धन्यवाद काँग्रेस, आमच्या डोक्याचा ताप आता तुम्ही घेणार, जेटलींचा शत्रुघ्न सिन्हांवर निशाणा

धन्यवाद काँग्रेस, आमच्या डोक्याचा ताप आता तुम्ही घेणार, जेटलींचा शत्रुघ्न सिन्हांवर निशाणा

Next

नवी दिल्ली- बिहारच्या पटना-साहिबचे खासदार आणि भाजपाचे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपानं त्यांचा पत्ता कट केल्यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये सामील होणार असून, रविशंकर प्रसाद यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत.

या मुद्द्यावरून आता भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अरुण जेटलींनीही काँग्रेसच्या आडून शत्रुघ्न सिन्हांना लक्ष्य केलं आहे. फेसबुकवर त्यांनी एक ब्लॉग लिहिला आहे. ब्लॉगमध्ये जेटली लिहितात, भाजपाच्या काही नावाजलेल्या चेहऱ्यांना काँग्रेसनं बक्षीस म्हणून स्वीकारलं आहे. त्यासाठी आम्ही काँग्रेसचे आभार मानतो, कारण काँग्रेसनं आमच्या डोक्याला ताप झालेले शत्रुघ्न सिन्हांना त्यांच्या पक्षात घेण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षांसाठी काही गोष्टी चांगल्या नाहीत. कारण राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसला कोणत्याही राज्यात इतर पक्षांशी अर्थपूर्ण आघाडी करण्यात यश आलेलं नाही.

तसेच त्यांनी विरोधकांच्या गठबंधनला सर्कशीची उपमा दिली आहे. महागठबंधन पहिल्यांदाच अपयशी झालं आहे. कारण तिसऱ्या टप्प्यातील नामांकनंही अंतिम टप्प्यात आली आहे. गठबंधनजवळ कोणीही नेता नाही किंवा कोणतीही योजना नाही. त्यांचे विचारही जुळत नाही. त्यांना वाटतं की, अराजक परिस्थिती निर्माण करून सत्ता प्राप्त करता येऊ शकते. पण तसं कधीच होऊ शकत नाही, असंही जेटली म्हणाले आहेत.     

Web Title: lok sabha election 2019 thanks congress for accepting bjp problem says finance minister arun jaitley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.