लखनऊ: पुढील काही महिन्यांत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे (Uttar Pradesh election) रणशिंग फुंकले जाणार असून, भाजपने आतापासूनच यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये इनकमिंगला सुरुवात झाली असून, जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर आता भाजपकडून छोट्या पक्षांना साद घातली जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष हा बुडते जहाज असून, आम्ही त्यांचे सहप्रवासी होऊ शकत नाही, असे ओम प्रकाश राजभर यांनी जाहीर केले आहे. (om prakash rajbhar declared that no question of alliance with bjp over up election)
जितीन प्रसाद यांच्या प्रवेशानंतर आता भाजपने अन्य लहान पक्षांना सोबत घेण्यासाठी रणनीती तयार केल्याचे सांगितले जात आहे. अपना दल आणि निषाद पक्षासह सुहेलदेव भारतीय समाज पक्षाला भाजपने साद घातली होती. मात्र, सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते ओम प्रकाश राजभर यांनी याला विरोध दर्शवला असून, भाजपसोबत युती करणार नसल्याचे जाहीर केले आहे. या संदर्भात राजभर यांनी एक ट्विट करून माहिती दिली आहे.
“LAC वर केवळ भारतच मागे हटतोय, चीन तर आणखी पुढे सरकतोय!”
निवडणुकीवेळी भाजपला आठवण होते
भाजप हे एक बुडते जहाज आहे. ज्यांना त्यांच्यासोबत जायचे आहे, त्यांनी जावे. पण आम्ही जाणार नाही. जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हाच भाजपला लहान पक्ष आणि मागासवर्ग समाजाची आठवण होते. मात्र, जेव्हा मुख्यमंत्रीपदाची चर्चा केली जाते, तेव्हा बाहेरून माणसे आणली जातात. केवळ मतांसाठी भाजप मागासवर्ग समाजाला जवळ करते. ज्या मुद्द्यावर गेल्या वेळेस युती झाली होती. ते मुद्दे अजूनही प्रलंबित आहेत, असा दावा राजभर यांनी केला आहे.
“अन्यथा आणखी वाईट परिस्थिती ओढवेल”; कपिल सिब्बलांचा पक्षनेतृत्वाला सूचक इशारा
कोणत्या तोंडाने मते मागायला जाणार
उत्तर प्रदेशात शिक्षक भरतीमध्ये मागासवर्ग समाजाला डावलले गेले, त्यांचे हक्क हिरावण्यात आले. मागासवर्ग समाजाला सामावून न घेणारी भाजप कोणत्या तोंडाने मते मागायला जाणार आहे, अशी विचारणा करत भाजपला पराभूत करण्यासाठी भागीदारी संकल्प मोर्चा तयार करण्यात आला असून, आमचा त्यांना पाठिंबा असेल, असे राजभर यांनी स्पष्ट केले.
“कोणतीही डील करून नाही तर देशहितासाठी भाजपमध्ये आलोय”: जितीन प्रसाद
दरम्यान, उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीत पोहोचले. ते येथे केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांना भेटणार आहेत. मुख्यमंत्री योगी दिल्लीतील युपी भवनात गेले. येथे काही वेळ थांबल्यानंतर, ते गृहमंत्री अमित शाह यांच्या निवास्थानी गेले. येथे दोन्ही नेत्यांत जवळपास दीड तास चर्चा झाली. पंतप्रधान मोदी आणि जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत. दुसरीकडे एनडीएचा घटक पक्ष अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांनीही गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.