मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात (Pooja Chavan Death Case) भारतीय जनता पक्षानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीसंजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपनं लावून धरली आहे. उद्यापासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) राठोड यांच्यावर नाराज असल्याचं आम्ही अनेक दिवसांपासून ऐकत आहोत. मुख्यमंत्री नाराज आहेत. मग गेल्या १८ दिवसांपासून तमाशा कशासाठी सुरू आहे, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.राठोडांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा अन् शिवसेनेत सुरू झाली वेगळीच स्पर्धाराज्यात मंत्री, सत्ताधारी आणि सामान्य जनतेसाठी वेगवेगळे नियम आहेत का, असा प्रश्न फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत विचारला. 'महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सरकारनं शक्ती कायदा आणण्याची तयारी सुरू केली आहे. दिशा कायद्यासाठी सरकारनं समिती स्थापन केली आहे. पण एका मंत्र्यावर इतके गंभीर आरोप होत असताना मुख्यमंत्री ठाकरे त्यांचा राजीनामा घेत नाहीत. राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, तर आम्ही दिशा कायद्यासाठी गठित समितीतून राजीनामे देऊ,' असा इशारा फडणवीस यांनी दिला.संजय राठोडांचा राजीनामा तडकाफडकी घेऊ नका; मुख्यमंत्री ठाकरेंवर महंतांचा दबाव?नव्या कायद्यामुळे मंत्र्यांना, सत्ताधाऱ्यांना लैंगिक स्वैराचार करण्याचा अधिकार मिळतो का, राठोड यांच्याविरोधात इतके भक्कम पुरावे असताना त्यांच्यावर कारवाई का होत नाही, ऑडिओ क्लिप, पूजा चव्हाणच्या मोबाईलवर आलेले संजय राठोड यांचे ४५ मिस्ड कॉल्स, १०० नंबरवर आलेला कॉल इतके पुरावे असतानाही राठोड यांना पाठिशी का घातलं जात आहे, अशी प्रश्नांची सरबत्ती विरोधी पक्षांनी केली. या प्रकरणात दोष राठोड यांचा नाही. त्यांना वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याचं म्हणत फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं.छत्रपती शिवराय, राजदंड अन् राजधर्म! संजय राऊतांचं सूचक ट्विट; आज राठोड राजीनामा देणार?सावरकर, मुख्यमंत्री अन् लाचारीस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीवरून फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर शरसंधान साधलं. 'स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीला मुख्यमंत्री अभिवादन करत नाही. त्यांच्याकडून साधं एक ट्विट केलं जात नाही. ही किती मोठी लाचारी आहे. काँग्रेसनं सावरकरांवर कायम अन्याय केला. पण शिवसेनेनं सत्तेसाठी सावरकरांवर जो अन्याय केला, त्याचं मला जास्त आश्चर्य वाटतं. माझा शिवसेनेचा एक फुकटाचा सल्ला आहे. सरकार येतं जातं. पण सत्तेसाठी कोण किती लाचारी पत्करली, याची नोंद इतिहास ठेवत असतो. काँग्रेससोबत राहून शिवसेनेनं सत्तेसाठी लाचारी पत्करू नये,' अशा शब्दांत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
Pooja Chavan Death Case: ...तर भाजपचे सगळे आमदार राजीनामा देणार; फडणवीसांचा आक्रमक पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 2:13 PM