कृत्रिम वलय बाजूला ठेवून जमिनीवर या, आशिष शेलार यांचे शिवसेनेवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 11:39 PM2021-01-10T23:39:43+5:302021-01-10T23:41:55+5:30
Ashish Shelar News : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित निकाल लागला नाही हे सत्य आहे. त्यामुळे माझ्यासह माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत बावनकुळे यांनी अभ्यास दौरा करून त्यातून धडा घेतला आहे
सावंतवाडी - कोकणात शिवसेनेचे वलय हे कृत्रिम आहे त्यानी नुसती वातावरण निर्मिती केली आहे शिवसेनेने वेळीच जमिनीवर यावे अन्यथा त्यांना येथील जनता येणाऱ्या निवडणुकीत जमिनीवर आणेल अशी टीका माजी मंत्री तथा भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली. राज्य सरकारने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या नेत्यांच्या सुरक्षित केलेली कपात म्हणजे असुरक्षित मनोवृत्तीच्या सरकारने घेतलेला हा निर्णय असल्याची टिका ही त्यांनी यावेळी केली.
भाजपा नेता आशिष शेलार हे रविवारी सावंतवाडी आले असता येथील नगरपालिकेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली नगराध्यक्ष संजू परब जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा सभापती उदय नाईक, अॅड. परिमल नाईक, राजू बेग, आनंद नेवगी, नगरसेविका दिपाली भालेकर, महिला शहर मंडल अध्यक्ष मोहिनी मडगावकर, मिसबा शेख, दिलीप भालेकर, महेश पांचाळ, बांदा सरपंच अक्रम खान, बंटी पुरोहित, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.
शेलार म्हणाले विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित निकाल लागला नाही हे सत्य आहे त्यामुळे माझ्यासह सह माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत बावनकुळे यांनी अभ्यास दौरा करून त्यातून धडा घेतला आहे त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपा स्थानिक पातळीवरच सक्षम असल्याने वरिष्ठ पातळीवरून कुठल्याही प्रकारे व्यापक दृष्टीने काम करण्याचा प्रश्न नाही फक्त कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी हा आपला दौरा असल्याचे त्यांनी सांगितले. तर सुरक्षेच्या बाबतीत राज्य सरकारने केलेले कपात म्हणजे असुरक्षित मनोवृत्तीच्या सरकारने घेतलेला हा निर्णय आहे मात्र पोलिसांनी जनतेची सुरक्षा करावी हेच अपेक्षित आहे आणि आमचेही असेच म्हणणे आहे त्यामुळे याच भूमिकेतून त्यांनी जर कपात केली असेल तर टीका करणे योग्य नाही असेही ते म्हणाले.
मुंबईमध्ये शिवसेनेने गुजराती लोकांसाठी घेतलेले मिळावे यामुळे मुंबईत भाजपाला तोटा होणार का असे त्यांना विचारले असता ते म्हणाले की शिवसेनेच्या भेसळयुक्त हिंदुत्व वादामुळे निर्माण झालेला खड्डा भरून काढण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न आहे मात्र हा प्रयत्न मुंबईची जनता आणून पडणार असून येणाऱ्या निवडणुकीत मुंबईकर सुनेला धडा शिकवतील असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
शिवसेनेने आगीशी खेळू नये..
राज्याचे नेतृत्व केलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे त्यांच्या सुरक्षितेच्या बाबतीत वर्गीकरण रद्द करायच आणि दुसरीकडे आमदार वैभव नाईक यांना वर्गीकरण द्यायचं असा अपव्यवहार राज्यात कधीच घडला नव्हता मात्र राज्य सरकार दुटप्पी भूमिका खेळत असून त्यांनी आगीशी खेळू नये आगीशी खेळल्यावर काय होते याची अनुभूती त्यांनी घ्यावी असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला