Video: “साहेब, आता मुख्यमंत्री होतायेत, काळजी नाही”; शिवसेना नेत्याची छत्रपती उदयनराजेंना गळाभेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 07:46 AM2021-03-21T07:46:47+5:302021-03-21T07:48:16+5:30
Mukesh Ambani Bomb Scare, Sachin Vaze, Param bir Singh Allegation on Anil Deshmukh: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(CM Uddhav Thackeray) पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांवर स्फोटक आरोप लावले आहेत,
सातारा – राज्याच्या राजकारणात सचिन वाझे प्रकरणामुळे ठाकरे सरकारची कोंडी झाली आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती, या प्रकरणाचा तपास सध्या NIA कडून सुरू आहे, यातच सचिन वाझे यांना अटक झाली, तर मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली. या प्रकरणाने राज्याचं वातावरण तापलं आहे.(Shivsena Narendra Patil Meet BJP MP Udayanraje Bhosale)
अशातच शिवसेनेचे सातारा लोकसभेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. नरेंद्र पाटील आणि भाजपाचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे रस्त्यात अचानक भेटले, त्यावेळी नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंची गळाभेट घेत साहेब, आता मुख्यमंत्री होतायेत, काळजी नाही आता म्हटल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(CM Uddhav Thackeray) पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांवर स्फोटक आरोप लावले आहेत, गृहमंत्र्यांनी सचिन वाझे(Sachin Vaze) यांना महिन्याला १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा धक्कादायक आरोप लावल्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली, शनिवारी दिवसभर या बातमीने राजकीय वर्तुळात भूकंप आला. गृहमंत्री अनिल देशमुख(Home Minister Anil Deshmukh) यांनी परमबीर सिंग यांचे आरोप फेटाळले असले तरी विरोधी पक्षाने या प्रकरणात आता आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपा, मनसे यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा द्या अन्यथा त्यांना बडतर्फ करा अशी मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
१८ मार्च रोजी ‘लोकमत’च्या कार्यक्रमामध्ये परमबीर सिंग यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे म्हटल्यानंतर सिंग यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने १९ मार्च रोजी पुन्हा व्हॉट्सॲपवर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप देशमुख यांनी केला आहे. आपणास उद्या म्हणजे दिनांक १७ मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी दिनांक १६ मार्चला एसीपी पाटील यांना व्हॉट्सॲप चॅटवरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली. हा परमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या चॅटच्या माध्यमातून सिंग यांना पध्दतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या चॅटवरून उत्तरे मिळविताना सिंग किती अधीर झाले होते हे त्यांच्या लक्षात येते. सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय, अशी विचारणा देशमुख यांनी केली आहे.
पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की, सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परमबीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. १६ वर्षे निलंबित असलेल्या वझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमवीर सिंग यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला. परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत, त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.