शिवसेनेनही पोस्टरच्या माध्यमातून मोदी सरकारच्या भाषणाबाजीचे दाखले देत ते बोलतात जास्त पण काम मात्र कमी करतात असा टोला हाणला.
शिवसेना वाघाचं कातडं पांघरून टीका करते पंतप्रधान मोदी मात्र वाघाच्या काळजाने जगात भारताचा दरारा कायम ठेवतात.
उद्धवा अजब तुझे विचार...
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत सरकारने १.४१ लाख कोटी रुपये वितरित केल्याचा दावा केला. पण ही रक्कम अवघी ३२८७ कोटी असल्याचे सांगत शिवसेनेने हाही एक जुमलाच असल्याची टीका केली.
युपीए सरकारच्या काळातील योजना नाव बदलून सादर केल्याने काही होत नाही अशी टीका सेनेने मोदी सरकारवर केली.
निडणुकीपूर्वी शेतक-यांना अग्रस्थानी ठेवणारा भाजपा निवडणुकीनंतर अन्नदात्याला विसरला.
भाजपाने उद्धव ठाकरेंची तुलना काजव्यांशी केली आहे
केंद्रात निजामाच्या बापाचं राज्य अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केलेली टीका भाजपाला रुचली नाही. आणि भाजपाने पोस्टरद्वारे संजय राऊत यांची तुलना वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असणा-या दिग्विजय सिंह यांच्याशी करत दोघांमध्ये फारसा फरक नसल्याचे म्हटले.
भाजपाने "आप"चे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिग्विजय सिंग संजय राऊत व उद्धव ठाकरे हे एकाच माळेतले मणी आहेत अशा तिखट शब्दात शिवसेनेवर वार केला.
मोदी सरकार सूट बूटच्या माध्यमातून सामान्य जनतेची लूट करते... हा आरोप विरोधक नव्हे भाजपाचे सत्तेतील भागीदार असलेल्या शिवसेनेनेच केला आहे.
उद्धव ठाकरे यांना बेडकाची उपमा देत भाजपाने त्यांच्यावर निशाणा साधला.
शिवसेनेने पोस्टरमधून नरेंद्र मोदींना "आयत्या बिळात नागोबा" म्हणत भाजपावर पलटवार केला.
पंतप्रधान मोदींवर टीका करणा-या उद्धवना भाजपाने अफझलखान म्हटले
केंद्र व राज्यातील सत्तेत भागीदार असूनही भारतीय जनता पक्ष व शिवसेना या दोन्ही पक्षात अद्यापही कुरबुरी सुरूच आहेत. कोणत्या ना कोणत्या तरी मुद्यावरून हे दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोन्ही पक्ष विविध पोस्टर्सच्या माध्यमांतून एकमेकांवर टीकास्त्र सोडत असतात.