काँग्रेसमध्ये जोरदार घमासान; अध्यक्षपदावरुन सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर शिवसेना म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 03:57 PM2020-08-24T15:57:04+5:302020-08-24T15:57:22+5:30

काँग्रेसला कायमस्वरुपी नेतृत्वाची गरज असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

Shiv Sena leader Sanjay Raut has expressed the view that Congress needs permanent leadership | काँग्रेसमध्ये जोरदार घमासान; अध्यक्षपदावरुन सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर शिवसेना म्हणते...

काँग्रेसमध्ये जोरदार घमासान; अध्यक्षपदावरुन सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर शिवसेना म्हणते...

googlenewsNext

नवी दिल्ली: काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधींनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधींनी अंतरिम अध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा सांभाळली. मात्र त्यांचा वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे काँग्रेसची सूत्रं नेमकी कोणाकडे जाणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर आता शिवसेनेने देखील आपली प्रतिक्रया दिली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या बाजूनं आपली भूमिका मांडली आहे. काँग्रेसला कायमस्वरुपी नेतृत्वाची गरज असल्याचे मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. देशाची प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका सांभाळण्यासाठी काँग्रेसला स्वत:ला सावरणं गरजेचं असल्याचं संजय राऊत यांनी सांगतिले.

तत्पूर्वी, राहुल गांधींनी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारावं. सोनिया गांधींनी पक्षाला उभारी दिली. कॉंग्रेस पक्षात खऱ्या अर्थानं लोकशाही असून गांधी कुटुंबानंच पक्षाचं नेतृत्व करावं. तसेच गांधी परिवाराकडे पक्ष आणि देश सांभाळण्याची क्षमता असल्याचं  पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे राहुल गांधींच्या इच्छेनुसारच कॉंग्रेस महाविकास आघाडीत सहभागी राहुल गांधींनी निर्णय घेतला की सरकारमधून बाहेर पडावं तर बाहेर पडू, असं मोठं विधानही विजय वडेट्टीवर यांनी केलं आहे. 

दरम्यान, काँग्रेसच्या देशभरातल्या २३ महत्त्वाच्या नेत्यांनी अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिलं. पक्षाला पूर्णवेळ आणि प्रभावी अध्यक्ष हवा, अशी मागणी या नेत्यांनी पत्रात केली. एका बाजूला २३ नेते पूर्णवेळ आणि प्रभावी अध्यक्ष द्या, अशी मागणी करत असताना दुसऱ्या बाजूला अनेक मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांनी सोनिया आणि राहुल गांधींच्या नेतृत्त्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. मात्र राहुल गांधी पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नसल्याचं वृत्त 'इंडिया टुडे'नं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.


आपण अध्यक्षपद स्वीकारण्यास उत्सुक नाही. त्याऐवजी गांधी कुटुंबाबाहेरील एखाद्या व्यक्तीकडे अध्यक्षपद सोपवण्यात यावं, असं राहुल गांधी यांचं मत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांचा कार्यकाळ संपल्यानं त्यांच्याऐवजी डॉ. मनमोहन सिंग किंवा ए. के. अँटनी यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवण्यात येईल. त्यांच्याकडे सोनिया गांधी यांच्याप्रमाणेच अंतरिम अध्यक्षपद दिलं जाईल. कोरोना संकट संपल्यानंतर पक्षाचं अधिवेशन होईल आणि राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षपद दिलं जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Shiv Sena leader Sanjay Raut has expressed the view that Congress needs permanent leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.