मराठा आरक्षणाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते असल्याने ते महाराष्ट्रतील राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी असल्याने त्यांनी यामध्ये लक्ष घालावे. अन्य़था मोठा उद्रेक होईल. या आधीचे मोर्चे शांततेत निघाले. परंतू आता काय होईल याची कल्पना करता येणार नाही, असा इशारा भाजपा खासदार उदयनराजे यांनी दिला. आज त्यांनी शरद पवार यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. (UdayanRaje bhosale met Sharad pawar on Maratha Reservation.)
आरक्षणाबाबत वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयाती नीट बाजू मांडली गेली नाही. पवारांची 6 जनपथ येथे भेट घेतली. त्यांना सरकारला काहीतरी मार्गदर्शन करण्याची मागणी केली. राज्यातील सरकार पवारांमुळेच सत्तेत आहे. त्यांनीच या सरकारची बांधणी केली. यामुळे नैतिकदृष्ट्या त्यांची देखील जबाबदारी आहे, असे उदयनराजे म्हणाले.
जर तुम्हाला आरक्षण द्यायचे नसेल तर तसे सांगावे. सरळ श्वेतपत्रिका काढा, पण मराठा समाजाचा उद्रेक व्हायची वाट पाहू नका. राज्याने आधीच कायदा केला आहे. ती राज्याची जबाबदारी, केंद्राची नाही. अशेक चव्हाण मुख्यमंत्री होते, यामुळे त्यांना चांगला अनुभव आहे, असेही उदयनराजेंनी सांगितले. मी नेहमीच रस्त्यावर असतो, उद्रेक होण्याची शक्यता. शिवजयंती म्हणजे महाराष्ट्रासह देशाची अस्मिता आहे. यामुळे सर्वांच्या मनात भावना असतात. उत्सव साजरा करण्याची तीव्रता पाहता कोरोनामुळे लोकांना धोका होऊ शकतो. यामुळे सरकारने काही बंधने घातली आहेत, असे सांगत उदयनराजेंनी शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यास पाठिंबा दर्शविला.